कल्याण-नाशिकमध्ये आपल्या महापालिकेच्या सत्ताकाळात मनसे जे रस्ते विकसीत केले. ते आजही उत्तम स्थितीत आहेत. पाऊस काय फक्त कल्याण डोंबिवलीत पडतो का ? नाशिकमध्ये पाऊस पडत नाही का ? नाशिकमधील रस्ते उत्तम राहतात. तर कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे का पडतात ? असा सवाल मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुणे आणि नाशिकमध्ये बैठका घेतल्या. त्याच धर्तीवर कल्याण डोंबिवलीतील मनसे पदधिका:याची बैठक मनसे नेते ठाकरे यांनी घेतली. या बैठकीपश्चात त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी उपरोक्त सवाल उपस्थित करीत मुंबई, ठाणो आणि कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे प्रश्नाचा समाचार घेतला. यावेळी मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अमेय खोपकर,मनसे आमदार राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.मनसे नेते ठाकरे यांनी आज मनसे बैठकीला येण्यासाठी दादरहून रेल्वेने प्रवास करुन डोंबिवली गाठली. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवलीत रस्त्यावरील खड्डयामुळेच रेल्वेने प्रवासकरुन अवघ्या 4क् मिनिटात डोंबिवली गाठली. मुंबईतही प्रचंड खड्डे आहे. मुंबईतून बाहेर पडता येत नाही. ट्रेनने आलो आत्ता पुन्हा घरी ट्रेनने जाणार आहे. सामान्यांना रस्त्यावरील खड्डय़ांचा किती त्रस सहन करावा लागतो याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. २५ वर्षापासून सत्तेवर असलेल्या पक्षांनी साधे रस्ते विकासाचे नियोजन करु शकले नाहीत. रस्ते नीट नाहीत. विकास करण्यासाठी इच्छा शक्ती लागते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडे ती इच्छा शक्ती आहे. याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी सांगितले की, कल्याण डोंबिवली परिसरात रस्त्यावरील खड्डय़ांची समस्या आहे. रस्त्यावरील खड्डय़ांच्या तक्रारी नागरीकांसह मनसे कार्यकत्र्यानी आमच्याकडे केलेल्या आहे. इथल्या सत्ताधा:यांनी अन्य समस्यांही सोडविलेल्या नाहीत.
९०० रुपयांच्या पास भुर्दंड एकदा प्रवास करणा:या प्रवाशाच्या माथी कशाला ?मनसे नेते ठाकरे यांनी सांगितले की, मी रेल्वेने दादरहून डोंबिवलीला आलो तेव्हा मला 900 रुपयांचा पास काढावा लागला. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या तिकीट दिले जावे. ज्या प्रवाशाला एकदाच प्रवास करायचा आहे. त्याला ९०० रुपये पास काढण्याची सक्ती का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिकीट देण्याची सुविधा सुरु करावी. सरसकट सगळया प्रवाशांना हा ९०० रुपयांचा भुर्दंड का असे ठाकरे यांनी सांगितले.