शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

आम्ही मेल्यावर आमची देणी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 12:38 AM

एनआरसी कामगारांच्या विधवांचा सवाल : हाडामांसाची माणसं हक्काकरिता लढताहेत

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घरामध्ये दिवाबत्ती नाही, पाण्याचा थेंब नाही, घरे मोडकळीस आली आहेत आणि कधीही बुलडोझर फिरवून उरलासुरला निवारा नष्ट केला जाईल, ही भीती, अशा अवस्थेतही हाडामासाची काही माणसं आपल्या हक्काकरिता लढत आहेत, घरे सोडायला तयार नाहीत. कुणाच्या नवऱ्याने आपल्या हक्काच्या पैशांकरिता टाचा घासून आत्महत्या केली, तर कुणी अन्नान दशा सोसत मरण पावला. ही व्यथा आहे एनआरसी कंपनीतील कामगारांच्या कुटुंबांची. अदानी उद्योगाने ही कंपनी खरेदी केली आहे. या कामगारांनी घरे सोडावीत, याकरिता दिवा-पाणी तोडले आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या कमल शाहू डोंगरे या साठीच्या महिलेने सवाल केला की, आम्ही माणसं नाहीत का? आम्ही मेल्यावर आम्हाला आमची देणी देणार आहात का? हे बोलताना त्या अक्षरश: रडत होत्या.

एनआरसी कंपनीपासून जवळच असलेल्या जेतवनगर टेकडीवर एका साध्या घरात राहणाऱ्या कमल शाहू डोंगरे यांचे पती शाहू हे १९७२ साली कामाला लागले. अनेक वर्षे ते कायमस्वरुपी कामगार नव्हते. शाहू यांना तीन मुले आणि पत्नी कमल असा परिवार होता. शाहू यांना दहा हजार रुपये पगार होता.  कंपनी २००९ साली बंद झाली. शाहू यांनी कर्ज काढले होते. घराचा खर्च कसा चालवायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याचे टेन्शन त्यांना होते.  कंपनीकडून थकीत देणी मिळत नसल्याने शाहू यांनी कंपनीच्या आवारातील आर. एस. इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून २०१२ साली आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी कमल यांना कंपनीकडून दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुले रिक्षा चालवितात. एक मुलगा पुण्याला आहे. मुलांचे त्यांच्याच कमाईत भागत नसल्याने कमल यांच्यावर एकटे   जीवन जगण्याची वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी दिवसभर त्या भंगार गोळा करतात. त्यातून त्यांना दिवसाला ६० ते १०० रुपये हातखर्ची सुटते.  त्यांना पायाचे आणि कंबरेचे दुखणे आहे. कंपनीकडून १० ते १५ लाख रुपयांची थकबाकी कमल यांना अपेक्षित आहे. कंपनीसमोर एनआरसी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमल यांचा पंधरा दिवसांचा रोजगार बुडाला आहे. सोजर कचरू ओव्हाळ या मूळच्या बीड जिल्ह्यातील लोणीच्या. त्यांचे पती कचरू हे लोणीचे. सोजर या त्यांच्या मामाकडे होत्या. मामांनी कचरूसोबत लग्न लावून दिले. कचरू हे एनआरसीत कामाला होते. बरीच वर्षे अस्थायी काम केल्यावर स्थायी स्वरुपात कायम मिळाल्यावर सात वर्षानी कंपनी बंद पडली. २०१६ मध्ये कचरू यांचे निधन झाले. कचरू हातगाडीवरून कागदाचा लगदा वाहून न्यायचे. त्यावेळी त्यांच्या पोटात गाडीचा दांडा घुसल्याने त्यांना दुखापत झाली होती. सोजर यांचा मुलगा विकास हा लॉकडाऊनमध्ये कामावर जात असताना पोलीस त्याच्या मागे लागले. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय मोडला. तो घरीच आहे. त्याने पत्नी व मुलांना माहेरी पाठवून दिले आहे. सोजर यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा डावा हात मोडला आहे. त्यात रॉड टाकला आहे. हात मोडल्याने धुणी भांड्याची कामे करता येत नाहीत. दोन वर्षांपासून हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्यावर कसे काय भागवायचे.  कंपनीकडून सोजर यांना २०.७१ लाख रुपये येणे बाकी आहे.            

एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू थकीत देणी मिळत नसल्याने कौशल्या पवळ यांचे पती किसन यांचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. कौशल्या यांना दोन मुले आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. कौशल्या मोहने परिसरात पापड लाटण्याचे काम करतात. त्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. एक किलो पापड लाटल्यावर १५ आणि दोन किलो पापड लाटल्यावर ३० रुपये मिळतात. गुडघ्याच्या त्रासामुळे जास्त वेळ पापड लाटता येत नाहीत. 

भाबड्या मुलीचेही हाल nतानाजी वीर हे कंपनी बंद झाल्यापासून भाजी विक्री करीत आहेत. दिवसाला शंभर रुपये कसेबसे सुटतात. त्यांना एक गतिमंद मुलगी आहे. तिच्या उपचाराचा खर्च जास्त आहे. वीर कंपनीच्या कामगार वसाहतीत राहतात. त्यांना हुसकावून काढण्याकरिता वीज - पाणीपुरवठा खंडित केला आहे. nउकाड्याचे दिवस सुरू झाल्याने त्यांची गतिमंद मुलगी रात्ररात्र झोपत नाही आणि पंखा लावा म्हणून सांगते. तिला काय उत्तर द्यायचे. रात्रीच्या अंधारात त्या भग्नावस्थेतील घरात वीर कंठाशी आलेला हुंदका फक्त दाबतात.