शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

देव तारी त्याला कोण मारी! उद्यान एक्स्प्रेसखाली येऊनही महिला सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 6:40 PM

Accident Case : बदलापूर डाऊन मार्गावरील घटना; कल्याण लोहमार्ग पोलिसांची चांगली कामगिरी

ठळक मुद्देसकाळी साधारण ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास डाऊन ट्रॅकवर ही घटना घडली.पोलिसांनी तिच्यासमवेत दिलेल्या पत्यावर घरी जाऊन तिची आई प्रमिला अनिल शिंदे वय वर्ष ५९ धंदा घरकाम यांच्याकडे सोपवण्यात आले.

डोंबिवली - मानसिक स्थिती चांगली नसलेली एक महिला बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळात खडीवर झोपली होती, त्या दरम्यान तिच्या अंगावरून उद्यान एक्स्प्रेस गेली असल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन कळताच गाडी अचानक थांबवण्यात आल्याची घटना बदलापूर स्थानकादरम्यान गुरुवारी घडली. त्याबाबत प्रसंगावधान ठेवून स्टेशन मास्तरांनी ऑनड्युटी पोलीस स्टाफला उद्घोषणा यंत्रावरून घटनास्थळी पाठवले. सुदैवाने ती महिला वाचली आणि त्या अपघातात तिला काहीही इजा पोहोचली नसल्याने सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

सकाळी साधारण ९ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास डाऊन ट्रॅकवर ही घटना घडली. सुमारे ३५ वयाची ती अनोळखी महिला ही गाडी खाली डाऊन ट्रॅकवर सुखरूप मिळून आली. ती खडीवर झोपलेल्या अवस्थेत असल्याने, तिच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखमा व इजा झाली नाही. त्यानुसार तीला आरपीएफ स्टॉप वर स्टेशन मास्टर लायसन्स पोर्टर स्टेचर हमाल यांच्या मदतीने बदलापूर ते, अंबरनाथ दरम्यान घटनास्थळावरून स्टेशन मास्टर समोर आणले. काही वेळाने सखोल चौकशी केली असता ती महिला घरगुती मानसिक तणावामुळे त्या ठिकाणी आल्याचे सांगितले. त्यानंतर तिने तिचे नाव श्रुती विशाल माळवे, राहणार मालप्लाझा सोसायटी/101 बदलापूर पूर्व अशी माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिच्यासमवेत दिलेल्या पत्यावर घरी जाऊन तिची आई प्रमिला अनिल शिंदे वय वर्ष ५९ धंदा घरकाम यांच्याकडे सोपवण्यात आले. त्यांनी रीतसर जबाब घेऊन तिच्या ताब्यात देण्यात आले. सदर महिलेबाबत तिच्या आईची काही एक तक्रार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

तसेच गेल्या आठ वर्षापासून तीची मानसिक स्थिती नाजूक असल्याचे सांगण्यात आले. अधून मधून घराबाहेर जात असते. आजही घरातून निघून गेली असल्याचे सांगण्यात आले. मात्र आरपीएफ महिला यांनी तिला सुखरूप ताब्यात दिले, त्याबद्दल त्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी शार्दूल यांनी दिली.

टॅग्स :AccidentअपघातdombivaliडोंबिवलीPoliceपोलिसrailwayरेल्वेWomenमहिला