मुरलीधर भवार, कल्याण-एनआरसी कंपनीच्या कामगारांच्या थकीत देणी मिळाली नसल्याने या प्रकरणी कामगार प्रतिनिधींनी शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल विधान भवनात भेट घेतली. आयटक युनियनचे सचिव उदय चौधरी. श्रीकांत कांबळे, मुकुंद भोईर, राजेश त्रीपाठी आणि सुनील थोरवे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी अदानी कंपनीच्या व्यवस्थापन प्रतिनिधींना बाोलावून लवकर वाद मिटविण्यासाठी स्वत: लक्ष घालून त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन युनिनच्या शिष्टमंडळास दिले आहे.
यावेळी युनियनचे सचिव चौधरी यांनी एनआरसी कंपनी आर्थिक डबघाईचे कारण देत मालकाने २००९ साली बंद केली. टाळे ठोकले. तेव्हापासून आजपर्यंत कामगार थकीत देण्याकरीता संघर्ष करीत आहेत. हे प्रकरण न’शनल ट्रीब्यूल कंपनी ला’ या लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. कामगारांची थकीत देणी न देताच एनआरसी कंपनीने अदानी उद्योग समूहाला कंपनीची जागा लिलावात दिली आहे. कंपनी कामगारांची थकीत देणी न देताच कामगारांना त्यांच्या वसाहतीतून इमारती धोकादायक झाल्याचे कारण सांगून हुसकावून लावले जात आहे. या विविध मुद्दाकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले आहे.