कल्याण दि. 5 (प्रतिनिधी) : श्री चैतन्य टेक्नो शाळेतील पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक विभागातील 12 विद्यार्थ्यांनी केवळ १०० मिनिटांत १०० गणित टेबल बोलून दाखवत एक विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये संपूर्ण भारतातून एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्व विद्यार्थ्याचा लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आला.
मुंबई विभाग श्री चैतन्य टेक्नो स्कूलचे जनरल मॅनेजर सुरेंद्र यांनी सांगितले, श्री चैतन्य टेक्नो शाळेने यापूर्वी दोन जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत . त्यानंतर गुरुवारी पुन्हा एक विक्रम केला आहे. या उपक्रमांमध्ये मुंबईमधील उल्हासनगर शाखेतील श्री चैतन्य टेक्नो स्कूल चे आर्या नायर , अनिश चुघ , अंश दुबे , शिवांश पांडे , विश्वेश एम , समीरण फुकान , हिरेन वळेचा , दर्शना होळकर , सिद्धांत पाटील , सिमरन लोखंडे , मयंक सिंग , मैत्री पटेल असे १२ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शाळेच्या मुख्याध्यापिका सीता पिंनामांनेनी यांनी सांगितले, शाळा नेहमीच पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक मधील मुलांमध्ये लपलेले, अंगभूत कौशल्ये बाहेर आणून उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया रचत आहेत. कमाल पातळीपर्यंत, त्यांच्या मेंदूला प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण देणे, दबावाशिवाय लहानपणापासूनच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे हाच आमचा उद्देश आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनद्वारे त्याचे निरीक्षण, चाचणी आणि रेकॉर्डिंग केले जाईल. या बाबी पूर्ण झाल्यावर द वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन, एक प्रमाणपत्र जारी करेल. मुलांना प्रेरित करण्यासाठी मेघा तांदळे, प्रांजली वराडे , सुप्रीता गौडा देखील हातभार आहे.