शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

यंदा १३ प्रवाशांचे आरपीएफने वाचविले प्राण, सर्वाधिक अपघात कल्याण स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 1:29 AM

Kalyan News : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत.

डोंबिवली : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत. २०१९ या वर्षात पुरुष आणि महिलांचे मिळून २१ जणांचे जीव वाचविले होते. यासाठी काही वेळा स्वत:चा जीव त्यांनी धोक्यात घातला होता. या अपघातांच्या बहुतांश घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, सह प्रवाशांच्या मोबाइलद्वारे समाज माध्यमांवर वेळोवेळी व्हायरल झाल्या आहेत.या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले. त्यापैकी बहुतेक जण लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढत अथवा उतरत होते. गेल्या वर्षीच्या २१ घटनांमध्ये दादर स्थानकात ७ आणि भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी २ जणांचे प्राण वाचविण्यात आले.सतर्क असलेले आरपीएफ जवान निष्काळजीपणाने वागणाऱ्या, धावत्या गाड्यांमध्ये चढणाऱ्या लोकांचे प्राण वाचवतात. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे काही जण आत्महत्येचा प्रयत्न करताना आढळून आले आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात न घातला शांततेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

जवानांचे काैतुक रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना गुन्हेगारी कारवाया, हिंसाचार, प्रवाशांच्या आंदोलनांमुळे रेल्वे गाड्या चालवण्यातील अडथळा, रेल्वे प्रवासात हरवलेल्या मुलांना शोधणे आणि गाड्या व रेल्वे परिसरातील अमली पदार्थ जप्त करणे अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते.  प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही त्यांना बारीक नजर ठेवावी लागते. अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच ते रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचविण्याचे कार्य करीत असल्याने रेल्वे प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे. 

या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेrailwayरेल्वे