कल्याण- कल्याण डोंबिवतील रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झालेली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्या एक दुचाकी चालक वाचविण्यासाठी गेला असता त्याने समोरून येणाऱ््या दुचाकी चालक ठोकर दिल्याने तो पडला. या अपघातात त्याचा उजवा हात मोडला आहे. हा तरुण दाद मागण्यासाठी कल्याण डोबिवली मुख्यालयात आला असता त्याला गेटवरील सुरक्षा रक्षकाने तुझ्या डोक्यावर परिमाण झाला आहे का असे बोलून त्याला वरिष्ठ अधिकाऱ््यांना भेटू दिले नाही. खड्ड्यांच्या तक्रारी करण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. मात्र प्रत्यक्ष तक्रार करण्यसाठी आलेल्या अपघातग्रस्त तरुणाला अशा प्रकारची वागणूक महापालिकेकडून दिली जात असल्याने तरुणाने संताप व्यक्त केला आहे.
शुभम सिंह हा तरुण बापगाव येथे राहतो. त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान कल्याणच्या रामबागेत आहे. २९ जुलै रोजी सकाळी तो नेहमी प्रमाणे त्याच्या दुकानावर जाण्याकरीता बापगाव येथून निघाला. गांधारी पूलाजवळ त्याची दुचाकी आली. तेव्हा त्याच्या समोरून येणाऱ््या दुचाकी चालकाने रस्त्यावरील खड्डा चुकविण्याचा प्रयत्न केला असता सिंह यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सिंग हे त्यांच्या दुचाकीवरुन खाली पडले. त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. सिंह याला उपचारासाठी कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्याचा हात अपघातामुळे फ्रॅक्चर झाल्याने त्याच्या हातावर उपचार करुन डॉक्टरांनी हातात रॉड टाकला आहे. त्याला हातावरील उपचारासाठी २९ हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच या दरम्यान ते उपचार घेत असल्याने त्याचे मोबाईल रिपेरिंगचे दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ज्या ठिकाणी या तरुणाचा अपघात झाला. त्याच ठिकाणी अन्य दुचाकी चालक रस्त्यावरील खड्ड्यामुळे पडून जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अन्य कोणत्या दुचाकी चालक अथवा वाहन चालकाचा अपघात होऊन नये. त्याच्या जीवावर बेतू नये, यासाठी अपघात ग्रस्त तरुण शुभम याने आज चार वाजता महापालिका मुख्यालय गाठले.