शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना १३ कोटी ८४ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 5:18 PM

आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा मुख्यमंत्र्यांकडे सुधारित प्रस्ताव सादरमंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.दरम्यान, ही नुकसानभरपाई कधी मिळणार अशी विचारणा करत इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांत नुकसानभरपाई न जमा झाल्यास महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलनास बसू, असा इशाराही दिला.आॅगस्टमध्ये झालेल्या महापुरात कृषीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मोटारी, केबल, ट्रान्स्फॉर्मरही वाहून गेले होते. गाळात रूतले होते. याचे पंचनामे महावितरणकडून करण्यात आले होते. तथापि, आजतागायत याची नुकसानभरपाई संबंधित कृषीपंपधारकांना मिळालेली नाही. याशिवाय या काळात मोटारी आणि वीजप्रवाहही बंद असतानादेखील महावितरणकडून कृषीपंपाचे सरासरी बिल काढले आहे. ही दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करूनही अधिकारी, कर्मचारी दाद देत नसल्याचे दिसते.

यावर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. इरिगेशन फेडरेशनने पाचवेळा भेट घेऊन समस्या मांडल्या, पण काहीही उपयोग होत नसल्याने आता चर्चा बस्स, आंदोलनच करायचे असे ठरवून इशारा देणारे निवेदन तयार केले. शुक्रवारी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, सुभाष महापुरे, आर. के. पाटील यांनी अधीक्षक अभियंता कावळे यांची भेट घेऊन त्यांना इशारा निवेदन दिले.यावेळी झालेल्या चर्चेत कावळे यांनी आम्ही महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले आहेत, पण आजपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आम्ही शून्य वीजबिलासह, बिल दुरुस्ती व अन्य नुकसानभरपाईचा निर्णय घेऊ, असे सांगितले. शासनाच्या मागणीनुसार नवीन प्रस्ताव पाठविला आहे, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.असा आहे सुधारित प्रस्तावसुरुवातीला साडेपंधरा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकेपणे प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याने नवीन १३ कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी पाठविला आहे. यात ट्रान्स्फॉर्मरसाठी २ कोटी ३८ लाख, डीपीसाठी १ कोटी ९३ लाख, एचटी केबल ४२ लाख, मोटार ६८ लाख, एलटी केबल ५ कोटी ५२ लाख, स्टार्टर ५८ लाख असा समावेश आहे.

मोटार बंद असतानाही वाढीव बिल आले कसे?या बैठकीत पाडळीचे कृषीपंपधारक गुणाजी जाधव यांनी दत्त पाणीपुरवठा संस्थेचे जूनमधील बिल ४ लाख ३ हजारांचे होते. पावसाळ््यात मोटार बंद असतानाही दोन महिन्यांपूर्वी ५ लाख ८३ हजारांचे बिल पाठविले आहे. दोन महिन्यांत १ लाख ८२ हजार कसे काय वाढले, ते सांगा असा प्रतिप्रश्नच अधीक्षक अभियंत्यांना केला. यावर अभियंता कावळे यांनी तक्रारी द्या, कारवाई करू असे सांगितले.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर