कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल १ कोटी ३६ लाख ६२ हजार १९६ कोटींची भर पडली आहे. उत्सव काळात १५ लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. या भाविकांकडून मंदिरातील देणगी पेटीत ही रक्कम टाकण्यात आली आहे. याशिवाय मंगळसुत्र, जोडवी, मणी सारखे दागिनेही आहेत. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सव काळात लाखो भाविक येतात. याकाळातच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीला सर्वाधीक उत्पन्न मिळते. नवरात्रौत्सवानंतर पहिल्यांदाच पेट्या उघडण्यात आल्या. सोमवारपासून देवस्थान समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात मोजदाद सुरू झाली ती शुक्रवारी संपली. मंदिर आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे ८ ते १० देणगी पेट्या आहेत त्यापैकी पेटी क्रमांक १ व २ मधून प्रत्येकी ४० लाख रुपये जमा झाले आहेत. अन्य पेट्यांमधूनही २३ लाख, ८ लाख, ५ लाख अशा रकम्या निघाल्या अशारितीने अंबाबाईच्या एकूण खजिन्यात १ कोटी ३६ लाख ६२ हजार १९६ रुपयांची भर पडली आहे. यासह अनेक भाविकांनी देणगी पेट्यांमध्ये मणी, मंगळसुत्र, जोडवी, नथ असे सोन्या-चांदीचे अलंकार टाकले आहेत.
कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींची भर
By इंदुमती सूर्यवंशी | Published: November 10, 2023 7:31 PM