गडहिंग्लज : शहरातील भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी यांनी आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. भटक्या श्वानांच्या झुंडी पहाटे फिरायला बाहेर पडणारे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, वृत्तपत्र व दूध विक्रेत्यांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
------------------------------
२) उत्तूर मठातील यात्रा रद्द
उत्तूर : येथील श्री सद्गुरू राजारमा महाराज मठातील महाशिवरात्री यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय शांत सांप्रदाय संघाचे अध्यक्ष पितांबर महाराज व सचिव वसंतराव कुंभार यांनी दिली.
------------------------------
३) गडहिंग्लजमध्ये गाडगेबाबांना अभिवादन
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त संस्थाध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सचिव प्रा. अनिल कुराडे, प्राचार्य एस. एम. कदम, आर. पी. हेंडगे, डॉ. सुधीर मुंज, शिवराम कडूकर, एस. डी. सावंत आदी उपस्थित होते.
------------------------------
४) कोवाडमध्ये महावितरणचे शिबिर
कोवाड : कोवाड (ता. चंदगड) येथे ‘महावितरण कृषी धोरण २०२०’ अंतर्गत महावितरणतर्फे आयोजित शिबिरात ८० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. उपकार्यकारी अभियंता नागेश बसरीकट्टी, उपअभियंता विशाल लोदी, सहाय्यक अभियंता अजित कांबळे, प्रवीण कांबळे यांनी शेतकऱ्यांना वीजपुरवठा, नियमावली, वीजबिले रिंडींग, मीटर दुरूस्तीविषयी मार्गदर्शन तर उपव्यवस्थापक आशपाक राऊत यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.
------------------------------
५) अडकूर संघाला उपविजेतेपद
चंदगड : अडकूर (ता. चंदगड) येथे महालक्ष्मी कब्बड्डी संघाने साळगाव येथे झालेल्या कब्बड्डी स्पर्धेत ३८ किलो वजनी गटात उपविजेतेपद पटकावले. विजयी संघामध्ये शाकीब शेख, उमेर शेख, शुभम शिवणगेकर, हर्षद घोरपडे, श्रावण शिवणगेकर, आदित्य नांदवडेकर, प्रणव शिवणगेकर, देव कांबळे, योगेश भेकणे यांचा समावेश होता.
------------------------------
६) नेसरी पोलीस ठाण्याला महामानवांच्या प्रतिमा भेट
नेसरी : नेसरी (ता. गडहिंग्लज) येथील पोलीस ठाण्याला फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचतर्फे महामानवांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्याकडे मंचचे अध्यक्ष अशोक पांडव यांनी प्रतिमा भेट दिल्या. यावेळी प्रकाश गुरव, के. डी. कांबळे, एच. एस. कुचेकर, अजित गणाचारी, विजय कांबळे, धोंडीबा कांबळे, तारेवाडी उपसरपंच युवराज पाटील, बिद्रेवाडीचे उपसरपंच राजेंद्र नाईक आदी उपस्थित होते.
------------------------------
७) कोरोना योद्धे वर्पे यांचा सत्कार
चंदगड : कोरोना काळात भटक्या समाजातील कुटुंबांना जीवाची पर्वा न करता, गावोगावी फिरून जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करणारे बेरडवाडा-वरगाव शाळेचे शिक्षक बाबूराव वर्पे यांचा माणगाववाडी (ता. चंदगड) येथील कार्यक्रमात खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार राजेश पाटील, यमाजीराव गावडे आदी उपस्थित होते.
------------------------------
८) हलकर्णीत सूर्यनमस्कार दिन
कोवाड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिन पार पडला. यावेळी योगतज्ज्ञ राजश्री कुंभार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी डॉ. अनिल गवळी होते. कार्यक्रमाला राजेश घोरपडे, चंद्रकांत पोतदार, जी. जे. गावडे, जे. जे. व्हटकर, सी. एम. तेली आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
------------------------------
९) आजऱ्यात वृक्षारोपण
आजरा : येथील पोलीस ठाणे परिसरात उडान फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस अंमलदार चेतन घाटगे, अमर अडसुळे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, अमोल पाटील, विशाल सुतार, संतोष घस्ती, रणजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
------------------------------
१०) आजऱ्यात १ मार्चपासून उपसाबंदी
आजरा : आजरा तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील शेळप, दाभिल, देवर्डे, साळगाव व सोहाळे या पाच बंधाऱ्यांवरील पाणी उपसा करण्यास दिनांक १ ते ७ मार्चअखेर बंदी केली आहे, अशी माहिती आजरा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी एन. डी. मळगेकर यांनी दिली.
------------------------------