शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

महिलांना १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देणार, मासिक पाळी स्वच्छता दिनी ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 5:17 PM

राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर : मासिक पाळी स्वच्छता दिनी महिलांसाठी राज्य शासनाकडून दारिद्र्यरेषेखालील तसेच बचत गटाच्या महिलांसाठी १ रुपयांत दहा सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील ६० लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार असून ही योजना १५ ऑगस्ट २०२२ पासून सुरू होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, शनिवारी दिली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेते मंत्री मुश्रीफ यांनी ही घोषणा केली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, आदिवासी व ग्रामीण भागातील महिलांसाठी मासिक पाळी हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा व प्रश्न आहे. गेल्या वर्षात मासिक पाळीच्या वेळी काळजी न घेतल्याने जगभरातील आठ लाख महिलांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील दारिद्र रेषेखालील महिलांसाठी एक रुपयांमध्ये ग्रामविकास खात्याकडून ही नवीन योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी २०० कोटी खर्च अपेक्षित असून त्याची तरतुद करण्यात आली आहे.१२ टक्केच महिलांकडून सॅनिटरी नॅपकीनचा वापरभारतात तीनशे वीस दशलक्ष मासिक पाळी होणाऱ्या महिला महिलांपैकी केवळ १२ टक्केच सॅनिटरी नॅपकिन वापरतात. यामुळे चार वर्षे भारतात ६० हजारांहून अधिक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारा मृत्यू पैकी दोन तृतीयांश मृत्यू मासिक पाळी बद्दलच्या समजूतीमध्ये निष्काळजीपणामुळे होतो. राज्यात केवळ ६६ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात.१९ वर्षाखालील युवतींना सहा नॅपकिन्स कीटआरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेत फक्त १९ वर्षाखालील युवतींना सहा रुपयात सहा नॅपकिन्स असलेले कीट पुरवण्यात येतात. सध्या ही योजना सुरु आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफWomenमहिलाHealthआरोग्य