शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

कोल्हापूर जिल्ह्यात पोस्टल मताचा टक्का वाढला, मतदारसंघनिहाय झालेले मतदान..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 4:22 PM

लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला होता. 

कोल्हापूर : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे इतके बंडखोर रिंगणात उतरल्याने राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये प्रचंड घासाघीस सुरू आहे. एकेका मतासाठी उमेदवार मतदारांचे उंबरे झिजवत असून, या निवडणुकीत पोस्टल मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदा पोस्टल मतदानाची आकडेवारीही कमालीची वाढली आहे. त्यामुळे हे मतदान कुणाच्या पारड्यात पडणार यावर गुलाल ठरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहा मतदारसंघांत मिळून १० हजार १०० मतदान पोस्टल आहे.निवडणूक कामात सहभाग घेतलेल्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल मतदानाची सुविधा असून ९ व १० नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्ह्यात हे पोस्टल मतदान झाले. तब्बल ९ हजार ६८९ जणांनी पोस्टल मतदान केले आहे. पोस्टल मतदानाचा हा टक्का सर्वाधिक आहे. निवडणूक अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आल्याने बहुतांश उमेदवारांनीही आपले मतदार असलेल्या बाहेरच्या जिल्ह्यांतील शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांना मतदान करण्याची विनंती केली होती. त्यामुळे यंदा रांगा लावून पोस्टल मतदान झाले आहे.

अटीतटीमुळे घेतला बोधपूर्वी पोस्टल मतदान हे एकून मतदानाच्या तुलनेत अत्यंत कमी असायचे. त्यामुळे या मताचे मोल उमेदवारांना वाटत नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निवडणुका अटीतटीच्या होऊ लागल्याने ही मते गुलाल लावण्यात महत्त्वाची भूमिका निभावू लागली आहेत. त्यामुळे या मतांचे महत्त्व उमेदवारांना जाणवू लागले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघात उद्धवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पोस्टल मतांमुळेच पराभव झाला. ‘काँटे की टक्कर’ झालेल्या या निवडणुकीत पोस्टल मतांमध्ये रवींद्र वायकर यांनी बाजी मारली. शिवाय, बीड लोकसभा मतदारसंघातही पोस्टल मतांची फेरमोजणी करण्याची वेळ आली. त्यामुळे ही मते किती निर्णायक ठरू शकतात, याचा प्रत्यय आला.

विधानसभा मतदारसंघनिहाय पोस्टल झालेले मतदानचंदगड- ११४०, राधानगरी- ११०९, कागल- ९६६, कोल्हापूर दक्षिण- ११४५, करवीर- १०६५, कोल्हापूर उत्तर- ८४९, शाहूवाडी- ९०८, हातकणंगले- ९०२, इचलकरंजी- ९५३, शिरोळ- ७५२.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Votingमतदानwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024