शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
JMM चे ३५ उमेदवार ठरले; कल्पना सोरेनही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
3
सीनिअर सिटिझन्ससाठी सुपरहिट आहे Post Officeची 'ही' स्कीम, ५ वर्षात केवळ व्याजातूनच मिळतील ₹१२,३०,०००
4
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
5
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
6
"मी काळवीटाची शिकार केली नाही!" बिष्णोईच्या धमक्यांदरम्यान सलमान खानचा व्हिडीओ व्हायरल
7
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरु-लक्ष्मीकृपेचा सुवर्ण योग; ‘या’ ६ गोष्टी करा, अमृत पुण्य मिळवा!
8
'केजीएफ' स्टार यश 'रामायण' मध्ये साकारणार रावणाची भूमिका, स्वत:च कन्फर्म करत म्हणाला...
9
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
11
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
12
१० व्या महिन्यात झाली डिलिव्हरी, सुप्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी झाली आई! सर्वांकडून अभिनंदन
13
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
14
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
15
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
16
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
17
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
18
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
19
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
20
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर

कोणत्याही व्यवहारासाठी आजपासून ५०० च्या मुद्रांक, बहिणींच्या अनुदानाचा भार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:11 PM

सर्वसामान्यांना मात्र आर्थिक फटका

कोल्हापूर : लाडकी बहीणसारख्या लोकप्रिय योजनांचा सत्ताधाऱ्यांनी पाऊस पाडल्याने १००, २०० रूपयांंचे मुद्रांक बंद करून सर्व व्यवहार आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर करावे लागणार आहेत. महसूल मिळवण्यासाठी सरकारने मुद्रांकाची किंमत वाढवली असून त्याची अंमलबजावणी आज बुधवारपासून सुरू होत आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमांमध्ये आणखी सुुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश राज्यपालांनी सोमवारी काढला.सर्वसाधारण व्यवहारासाठी जसे की, प्रतिज्ञापत्र, भाडे करार, विविध कर्ज प्रकरणांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, शैक्षणिक कामांसाठी लागणारी प्रतिज्ञापत्रे, संचकार पत्र, विक्री करार अशा एक ना अनेक कामांसाठी सरसकट १०० रुपयांच्या मुद्रांकांचा वापर केला जात होता. परंतु त्याच कामांसाठी आता लोकांना जादा ४०० रुपये मोजावे लागणार आहेत. हक्क सोडपत्रासाठी आतापर्यंत २०० रुपयांचा मुद्रांक वापरला जात होता, त्यासाठीही आता ५०० रुपये लागणार आहेत.पूर्वी केलेल्या करारपत्राचा आता अंतिम विक्री दस्त करायचा झाल्यास त्यांनाही वाढीव मुद्रांक भरावा लागेल. मुद्रांक शुल्क बसविण्यात सुलभता व एकरूपता आणण्याच्या आणि शासनाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने ही सुधारणा करण्यात आल्याचे या अध्यादेशात म्हटले आहे. विविध लोकानुययी योजनांचा कोट्यवधींचा बोजा सरकारच्या तिजोरीवर पडत आहे. परिणामी इतर योजनांसाठी, विकासकामांसाठी निधींची कमतरता पडत असल्याने सरकार उत्पन्न वाढीसाठी असे विविध निर्णय घेत आहे.

  • दृष्टिक्षेपात मुद्रांक विक्रेते
  • राज्यभरात विक्रेते : ५५००
  • विक्रेत्यांना मिळणारे कमिशन : १०० रुपयांस ३ रुपये.
  • कोल्हापूर जिल्हयातील विक्रेते : १०० हून अधिक

जिल्हाधिकाऱ्यांची आज भेटसर्वसामान्यांना कोणतेही प्रतिज्ञापत्र करण्यासाठी १०० रुपयांचा मुद्रांकच परवडणारा आहे. त्यासाठी त्याला ५०० रुपये मोजावे लागू नयेत. त्यामुळे ही ५ पट वाढ कमी करावी अशी मागणी कोल्हापुरातील मुद्रांक विक्रेते आज बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य लोकांना आर्थिक झळ बसणार आहे. शासनाने आम्हाला १०० आणि ५०० रुपयांचे मुद्रांक बंद करणार नाही, असे २०२३ ला लेखी दिले असतानाही आता असा निर्णय घेतला असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत. या दरवाढीस आमचा विरोधच आहे. - शंकर भिसे अध्यक्ष, मुद्रांक विक्रेता दस्त लेखनिक संघ महाराष्ट्र राज्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूर