गडहिंग्लज : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथे ‘लोकमत’च्या महारक्तदान अभियानांतर्गत आयोजित शिबिरात १०० पिशव्या रक्तसंकलन झाले. कै. संभाजी फुटाणे ग्रुप व डॉ. घाळी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले.
प्रारंभी ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा व स्व. डॉ. एस. एस. घाळी यांच्या प्रतिमेचे पूजन विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी व प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांच्याहस्ते झाले.
यावेळी ‘लोकमत’ गडहिंग्लज विभागीय कार्यालय प्रमुख राम मगदूम, बातमीदार शिवानंद पाटील, प्रा. अनिल उंदरे, प्रा. विकास अतिग्रे, प्रा. संतोष बाबर, प्रा. नीलेश शेळके, प्रा. अश्विन गोडघाटे, ग्रंथपाल राजेंद्र सावेकर, लायन्स ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष पाटील, जनसंपर्क अधिकारी राजू कुंभार, ग्रामसेवक राजेंद्र गवळी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी ग्रामपंचायत सदस्य भीमा दुंडगे, हुवाप्पा करिगार, अजित कांबळे, पद्मा तोडकर सुरेखा हुंचाळे, पोलीस पाटील अनिल हसुरे, आप्पासाहेब तोडकर, संभाजी चिटणीस, विरू मोरे, सुरेश हुंचाळे, उमेश साठे, संजय दुंडगे, लक्ष्मण कांबळे, सतीश शेंडगे, किरण तोडकर, संदीप हसुरे, दीपक मायन्नावर, इराप्पा उदगट्टी, श्यामराव शिप्पुरे, सचिन कोकणे, नीळकंठ तोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
सरपंच प्रभावती बागी यांनी स्वागत केले. प्रा. जयश्री तेली यांनी प्रास्ताविक केले. गौरी तेली हिने सूत्रसंचालन केले. उपसरपंच सचिन शेंडगे यांनी आभार मानले. रक्तसंकलनासाठी येथील आण्णासाहेब गळतगे लायन्स ब्लड बँकेने सहकार्य लाभले.
चौकट : डॉ. घाळींना अनोखी आदरांजली..!
गडहिंग्लजचे माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित शिबिरात १०० पिशव्या रक्तदान करून हसूरचंपूकरांनी अनोखी आदरांजली वाहिली. माजी सभापती प्रा. जयश्री तेली व उद्योजक संतोष तेली यांनी शिबिराचे नियोजन केले होते.
चौकट : गायत्रीच्या सत्काराने सारेच भारावले..!
दहावीच्या परीक्षेत ९८ टक्के गुण मिळविल्याबद्दल स्व. संभाजी फुटाणे यांची कन्या गायत्री हिचा प्रा. जयश्री तेली यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या कुटुंबीयांसह उपस्थित सारेच भारावून गेले.
------------------------
फोटो ओळी : हसूरचंपू (ता. गडहिंग्लज) येथील शिबिरात गौरी संतोष तेली हिने प्रथमच रक्तदान केले. यावेळी ‘लोकमत’चे गडहिंग्लज विभागीय प्रमुख राम मगदूम, सरपंच प्रभावती बागी, उपसरपंच सचिन शेंडगे, संतोष तेली, जयश्री तेली आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : १२०७२०२१-गड-०७