शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

साखर मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:48 AM

कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची ...

कोल्हापूर : साखरेचा किमान हमीभाव ३१०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित केल्याने बॅँकांनी साखरेवरील उचलीतही वाढ केली आहे. मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ झाली असून, १२.५ टक्के उताऱ्याला ३२९३ रुपये उचल मिळणार आहे. मिळणारी उचल, उपपदार्थांच्या पैशांमुळे कारखानदारांना एफआरपी देण्यासाठी थोडासा दिलासा मिळाला असला, तरी एकरकमी एफआरपी देण्यासाठी कारखान्यांची दमछाकच होणार आहे.यंदा हंगाम सुरू झाल्यापासून दरात २८ रुपयांपर्यंत घसरण झाल्याने केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल २९०० रुपये केला. त्यानंतर साखरेचे दर ३००० रुपयांवर स्थिरावले. बॅँकांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन, मूल्यांकनानुसार प्रतिक्विंटल ३००० हजार रुपये कारखान्यांना पैसे दिले. मूल्यांकनाच्या ८५ टक्केप्रमाणे २५५० रुपये प्रतिक्विंटल कारखान्यांना मिळत होते. त्यातून ऊसतोडणी-वाहतूक, प्रक्रिया खर्च व बॅँकांची देणी दिल्यानंतर उसासाठी १८०० ते १९०० रुपयेच हातात राहत होते; त्यामुळे एकरकमी एफआरपी न देता, प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे कारखान्यांनी शेतकºयांना पैसे दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याला विरोध केला. त्यात केंद्र सरकारने साखरेचा किमान हमीभाव २९०० वरून ३१०० रुपये केला. बाजारात साखरेचे दर झटक्यात वाढल्याने बॅँकांनी मूल्यांकनातही वाढ केली आहे.राज्य बॅँकेने मूल्यांकनात १०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे सरासरी १२.५ टक्के उतारा असणाºया कारखान्याला बॅँकेकडून ३२९३ रुपये मिळतील. त्याशिवाय मोलॅसिस, बगॅस, डिस्टिलरीतून सरासरी ४५० रुपये उपलब्ध होऊ शकतात; त्यामुळे कारखान्यांच्या हातात प्रतिटन ३७४३ रुपये मिळतील. त्यातून ऊस तोडणी-ओढणी, प्रक्रिया खर्च व बॅँकांचे हप्ते असे सरासरी १०५० रुपये वजा जाता, २६९३ रुपये एफआरपीसाठी राहू शकतात; पण हे तयार झालेल्या सगळ्या साखरेचा प्रतिक्विंटल ३१०० रुपयांनी हिशेब केला. यातून निर्यात साखरेच्या दरातील तफावत व सभासदांना दिल्या जाणाºया सवलतीच्या साखरेचा हिशेब करावा लागणार आहे. हा फटका टनाला सरासरी १०० ते १५० रुपये बसू शकतो; त्यामुळे मूल्यांकनात १00 रुपयांची वाढ झाली, तरीही एकरकमी एफआरपी देताना कारखान्यांची दमछाक होणारच आहे.कर्जातीलकारखाने खाईतचसाखरेच्या किमान दरात वाढ झाली असली, तरी यातून कारखानदारी पूर्णत: बाहेर येईल, असे वाटत नाही. हंगामात अनेक कारखान्यांकडे कामगारांचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. बिगर हंगामात तर पगारच होणार नाहीत, अशी अनेक कारखान्यांची परिस्थिती आहे. भरमसाट कर्ज असणारे कारखाने खाईत लोटण्याची भीती व्यक्त होत आहे.वाढीव मूल्यांकनानुसार उपलब्ध रक्कम - २६३५ रुपये प्रतिक्विंटल१२.५ टक्के उताºयासाठी मिळणारी रक्कम - ३२९३ रुपयेमोलॅसिस, बगॅस, डिस्टलरीचे उत्पन्न - ४५० रुपयेतोडणी, प्रक्रिया खर्च, बॅँक हप्ते - १०५० रुपयेनिव्वळ उसासाठी शिल्लक रक्कम - २६९३ रुपये