कोल्हापूर : मुंबईतील स्वदेश फाऊंडेशनतर्फे पन्हाळा तालुक्यासाठी पाच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देण्यात आले. पन्हाळ्याला जाण्यासाठीचा रस्ता सध्या बंद असल्याने हे साहित्य कोडोली येथील ग्रामीण रूग्णालय प्रशासनाच्या ताब्यात नुकतेच देण्यात आले.
कोरोनामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. यामुळे स्वदेश फाऊंडेशनतर्फे कॉन्सन्ट्रेटर व जम्बो ऑक्सिजन सिलिंडर देणगी स्वरूपात देण्यात आले. हे साहित्य देण्यासाठी फाऊंडेशनचे उपसंचालक व पन्हाळ्याचे सुपुत्र तुषार इनामदार यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, याच फाऊंडेशनतर्फे रायगड, नाशिक जिल्ह्यांसाठी देणगी दिलेल्या १४ रूग्णवाहिकांचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथील एका कार्यक्रमात करण्यात आले.
फोटो : २२०८२०२१-कोल- स्वदेश फाऊंडेशन
कोडोली येथील ग्रामीण रूग्णालयात मुंबईतील स्वदेश फाऊंडेशनतर्फे पाठविण्यात आलेले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर पोहोच झाले.