शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

Corona vaccine In Kolhapur : ७६ गावांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 11:47 AM

Corona vaccine In Kolhapur : लस अपुरी असतानाही योग्य नियोजन करत आणि प्राधान्यक्रम ठरवत जिल्ह्यातील ७६ गावांमधील ४५ वयावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर या नागरिकांना एक प्रकारचा दिलासाच दिला आहे.

ठळक मुद्दे७६ गावांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण आरोग्य विभागाची कामगिरी : पुरेशी लस नसतानाही केले नियोजन

कोल्हापूर : लस अपुरी असतानाही योग्य नियोजन करत आणि प्राधान्यक्रम ठरवत जिल्ह्यातील ७६ गावांमधील ४५ वयावरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामूहिक कामगिरीच्या जोरावर या नागरिकांना एक प्रकारचा दिलासाच दिला आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, नंतर फ्रंटलाईन वर्कर अशांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, नंतर ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लसीचा पुरवठाच खंडित होऊ लागल्याने अडचणी निर्माण झाल्या. तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस वाया न घालवता अधिकाधिक नागरिकांना ती कशी मिळेल यासाठी प्रयत्न केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आणि लसीकरण मोहिमेचे समन्वयक डॉ. फारूक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी या ७६ गावांमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करून घेतले आहे.१०० टक्के लसीककरण झालेली गावे

  • आजरा : पेंढारवाडी, चिमणे, करपेवाडी, धामणे, चव्हाणवाडी, वडकशिवाले
  • चंदगड : अडकूर, उत्साळी, मुगळी, इब्राहिमपूर, बुझवडे, पोरेवाडी, हालगोळी, केरवडे, बाळकोळी, केरवडे, बाळकोळी, इनाम सावर्डे, पिळणी, कानूर खुर्द, बिजूर, म्हाळुंगे, सडेगुडवळे, उमगाव, न्हावेली, अडकूर, झांबरे, भोगोली, किटवाड, नरगडे, किणी, मलतवाडी, सुपे
  • ३. गगनबावडा : माग्रेवाडी, मांडुकली, साळवण, सांगशी
  • ४.हातकणंगले : नवे पारगाव, कासारवाडी
  • ५. कागल : लिंगनूर, कापशी, बोळावीवाडी
  • ६.पन्हाळा : बाजार भोगाव, पोहाळे तर्फ बोरगाव, पोर्ले तर्फ बोरगाव
  • ७. राधानगरी : पालबुद्रुक, कुरणीवाडी, कुदळवाडी, धरमलेवाडी
  • ८. शाहूवाडी : माणगाव, हावडे, खेडे, विरळे, तोंडोळी, शित्तूर वारूण, शिराळे वारूण, सावे, आकुळे, कोतोली, भेडसगाव, माणगाव, तुरूकवाडी, येळावे, सरूड, शिंपे, कापशी, थेरगाव, वडगावचार तालुके निरंक

जिल्ह्यातील करवीर, शिरोळ, भुदरगड आणि गडहिंग्लज या तालुक्यातील एकही गांव अजून शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. याउलट चंदगड व शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम गावांचे लसीकरण झाले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसkolhapurकोल्हापूर