शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

शिष्यवृत्तीचे थकले तब्बल १०२ कोटी, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला 'खो'

By पोपट केशव पवार | Published: September 25, 2023 1:24 PM

कागदपत्रे न अडवण्याचे समाजकल्याणचे आवाहन

पोपट पवारकोल्हापूर : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, शुल्कासाठी त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी सरकारने त्यांना शिष्यवृत्ती सुरू केली खरी. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या विद्यार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता पूर्ण मिळाला नसल्याने या विद्यार्थ्यांची फरपट सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील तब्बल १०२ कोटी रुपयांहून अधिकची शिष्यवृत्ती थकली आहे. त्यामुळे संबंधित महाविद्यालय प्रशासन अशा विद्यार्थ्यांकडे फी वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता दिला जातो. यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी दिली जाते. अकरावीपासून ते पी.एचडी.पर्यंत विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्त्या दिल्या जातात. ही शिष्यवृत्तीची रक्क्म महाडीबीटी अंतर्गत वितरित केली जाते. मात्र, सध्या समाजकल्याण विभागाकडे निधीची कमतरता असल्याने ही शिष्यवृत्ती गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमाच झालेली नाही. यामुळे संबंधित कॉलेज व विद्यार्थ्यांमध्ये वादाचे प्रकार घडत आहेत. या शुल्कासाठी कॉलेज प्रशासन विद्यार्थ्यांकडे तगादा लावत आहेत.

कोणत्या प्रकारची शिष्यवृत्तीभारत सरकार, फ्री शिप शिष्यवृत्ती व राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीव्हीजेएनटी-एसबीसी                                 किती अर्ज आले      किती रक्कम दिली          थकित रक्कम२०२२-२३          २७४७८                ६०, ७, ८६, ५०९           २९, २, ४५.१०३ २०२१-२२           २५३५०                ८०, ७९, २७, ७४१          १, ९६, ३१, ८६० 

एस्सी प्रवर्गातील थकीत शिष्यवृत्ती                      किती अर्ज आले     किती रक्कम दिली     थकीत रक्कम२०२२-२३ :      १७९२१                 ३२, ९, ४, ५४९           ३७, ९२, ६५, ०००२०२१-२२ :     १८०७९                  ३३, ८७, १८००            ३२, ५४, ३२, १२७            

मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकली असली तरी विद्यार्थ्याची कागदपत्रे अडवू नयेत असे पत्र संबंधित महाविद्यालयांना दिले आहे. जर कुणाच्या कागदपत्रांसाठी अडवणूक होत असेल तर समाजकल्याण विभागाशी संपर्क साधावा.  - सचिन साळे, सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग कोल्हापूर

राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास अडचणी येत आहेत. यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. ही शिष्यवृत्ती सरकारने त्वरित वितरित करावी. - प्रा. शहाजी कांबळे, राज्य संघटन सचिव, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट )

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्ती