कोल्हापूर : शहरांमध्ये सोमवारी दिवसभरात कोरोनामुळे आणखीन चौघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत १०६ जणांचा या आजारामुळे बळी गेला आहे. दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.शहरातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत ४७०० च्यावर कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे तर या आजाराने १०६ जणांचा बळी घेतला आहे. ऑगस्टमध्ये सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण आहे. सोमवार दिवसभरात नव्याने १०९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
यामध्ये शिवाजी पेठ सर्वाधिक १४, मंगळवार पेठ ७,संभाजीनगर ४, कदमवाडी ६, ताराबाई पार्क ५, नागाळा पार्क ४, देवकर पाणंद ६, प्रतिभानगर ५ असा समावेश आहे.आणखीन चौघांचा मृत्यूशहरामध्ये दिवसभरात चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये रविवार पेठ ५२ वर्षीय महिला, शुक्रवार पेठ ७६ वर्षाचा पुरुष, नागाळा पार्कमध्ये ६४ वर्षाचा पुरुष,वर्षानगरमध्ये ६९ वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहेहॉटस्पॉटमधील रुग्णराजारामपुरी ३५६, शिवाजी पेठ २६७, कसबा बावडा २२४, मंगळवार पेठ २२९,शाहूपुरी १४३, संभाजीनगर १४३, जवाहरनगर ११७, कदमवाडी ११३
- एकूण परिसर सील २२९
- सील काढलेले परिसर ९८
- सध्या सील असणारे परिसर १३१