शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

दहावीचे परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था बदलल्याने गोंधळ, कोल्हापुरात एका परीक्षा केंद्रावर घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:30 PM

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेची अचानक परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था बदलल्याची माहिती काही विद्यार्थी आणि ...

कोल्हापूर: शिवाजी पेठेतील एका परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेची अचानक परीक्षा केंद्रावरील बैठक व्यवस्था बदलल्याची माहिती काही विद्यार्थी आणि पालकांना मिळाल्याने मोठी तारांबळ उडाली. त्यावेळी काही पालकांनी संबंधितांना धारेवर धरल्याने काही वेळ गोंधळ उडाला. बुधवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा सुरू आहे. बुधवारी मराठी आणि इंग्रजी माध्यमांचा गणित-१ या विषयाचा पेपर होता. सकाळी साडेदहा वाजता विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात सोडण्यात आले. त्यावेळी ९ मार्च रोजी केंद्र संचालकांनी बैठक व्यवस्थेचे वेळापत्रक फलकावर लावले होते. त्याचे फोटोही पालकांनी काढले होते. ९ मार्चच्या बैठक व्यवस्थानुसार खोली क्रमांक आणि परीक्षा केंद्राची खात्री पालकांनी केली होती. मात्र बुधवारी सकाळी ही बैठक व्यवस्था आणि काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलल्याचे पालकांच्या लक्षात आले. पालकांनी संबंधितांना जाब विचारला.त्यावेळी संबंधितांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी पालकांनी सुधारित बैठक व्यवस्था का पाहिली नाही, असे त्यांना सांगितले. त्यावेळी काही वेळ गोंधळ उडाला. अखेर पेपर चुकू नये, म्हणून बदल झालेल्या परीक्षा केंद्रावर काही पालकांनी धाव घेऊन विद्यार्थ्यांना सोडले.

बदललेल्या बैठक व्यवस्थेची पूर्वकल्पना केंद्र संचालकांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना देणे ही जबाबदारी आहे. संबंधित प्रकाराची चौकशी केली जाईल. अद्याप पालकांकडून याप्रकरणी लेखी तक्रार आलेली नाही. - सुभाष चौगुले, सचिव, एसएससी बोर्ड

टॅग्स :kolhapurकोल्हापूरssc examदहावीStudentविद्यार्थी