शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

गुळाच्या थकबाकीपोटी उचलले पेट्रोल पंपावरील ११ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 11:23 AM

Farmer Kolhapur-शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे साडे चार वर्षांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

ठळक मुद्दे शेतकरी संघ संचालकांचा प्रताप पैसे घेणारा संचालक नामनिराळा, उलट व्याजमाफीसाठी धडपड

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या एका संचालकाच्या गुळाची थकबाकी भागवण्यासाठी चक्क चार पेट्रोल पंपांवरील अकरा लाखांची उचल करण्याचा प्रताप संघ व्यवस्थापनाने केला आहे. संबंधित संचालकांच्या नावावार डिझेल व पेट्रोल विक्री दाखवून या पैशांची उचल केली असली तरी अकरा लाखांचे साडे चार वर्षांचे ४ लाख ५० हजार व्याज माफ करण्याचा प्रयत्न असल्याने काही संचालक व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.कारभारी मंडळीमुळेच संघ आतबट्यात आला. गेल्या पाच वर्षांत संघाचा गाडा रुळावर येईल, असे वाटत असतानाच अनेक प्रकारामुळे संघाच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले. निवडणुकीनंतर एका संचालकाने संघाच्या गूळ अडत दुकानात गूळ लावण्यापोटी अकरा लाखांच्या ॲडव्हांसची उचल केली. गेली साडेचार वर्षे त्यातील एक दमडीही भरली नाही.

संघाच्या पोटनियमानुसार जर घेतलेल्या ॲडव्हांसची हंगामात परतफेड झाली नाही तर त्यावर व्याज आकारणी करायची असते. त्यानुसार अकरा लाख मुद्दल व ४ लाख ५० हजार व्याज झाले. हा मुद्दा गेली दोन वर्षे संघाच्या संचालक मंडळात गाजत आहे. शासकीय लेखा परीक्षकांनी या थकबाकीवर आक्षेप घेत भरण्याचे आदेश दिले, तरीही संबधित संचालकाने पैसे भरले नाहीत.

लेखा परीक्षकांच्या कारवाईतून वाचण्यासाठी त्र्यंबोली, बिद्री, नेसरी व कार्वे या पेट्रोल पंपांवर संबंधित संचालकाच्या नावे डिझेल व पेट्रोल विक्री उधारीवर दाखवून तेथील अकरा लाखांची उचल केली. ते गुळाच्या थकबाकीला भरले. यावर एका युवा संचालकाने जोरदार हरकत घेत भांडाफोड करण्याची धमकी दिल्यानंतर संबंधित संचालकाने सहा लाख रुपये जमा केले. मात्र, उर्वरित पाच लाख व व्याज भरणार नाही, यावर ते ठाम आहेत.पाच लाखांचा धनी कोण?संचालकाने ११ लाख आपल्या नावावर उचल केली आणि त्यातील दुसऱ्या संचालकाला पाच लाख दिले. ते संचालक सध्या अपात्र असल्याने त्यांनी हात वर केल्याचे समजते. त्यामुळे पाच लाखांचा धनी कोण? देणारा, घेणारा की द्यायला लावणारा, याविषयी संघात जोरदार चर्चा सुरू आहे.एका चॉकलेटसाठी कर्मचारी निलंबिततात्यासाहेब मोहिते, बाबा नेसरीकर यांच्यासारख्या नेत्यांनी संघाला वैभवाच्या शिखरावर नेऊन ठेवले, त्यामागे त्यांचा त्याग होता, कर्मचाऱ्यांना लावलेली शिस्त होती. मेडिकलच्या दुकानात सुटे पैसे नसले तरी ग्राहकांना चॉकलेट दिले जात होते. त्या चॉकलेटच्या बरणीतील एक चॉकलेट कमी होते, म्हणून बाबा नेसरीकर यांनी संबंधित कर्मचाऱ्याला एक दिवस निलंबित केले होते.शाखा दुरुस्तीच्या नावाखाली ३६ लाख खर्चसंघाने नंदगाव येथे नऊ लाखांचे शेड उभा केले. वास्तविक टेंडर काढून ही प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. मात्र, आपल्या जवळच्या ठेकेदाराला काम दिले. गेल्या वर्षभरात शाखा दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल ३६ लाख भांडवली खर्च पडल्याचे समजते.

गुळापोटी सगळ्यांनाच ॲडव्हांस दिले जाते, ह्यत्याह्ण संचालकाचे ११ लाख थकीत होते, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्यांनी पैसे भरले आहेत, साडेचार लाख व्याजमाफीसाठी त्यांनी अर्ज केला आहे.- जी. डी. पाटील,अध्यक्ष, शेतकरी संघ

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर