दत्तवाड : येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांसाठी तब्बल ११० उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता माघारीकडे लागल्या आहेत. सोमवारी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी, अपक्ष उमेदवारांची संख्या जास्त असल्याने गावात वेगवेगळ्या गटात पॅनेल बनवण्याबद्दल अद्याप चर्चा सुरू आहे. तिरंगी व काही ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. तथापि माघार घेण्यासाठी अपक्ष उमेदवारांची मनधरणी सध्या सुरू आहे.
उध्दव मगदूम यांनी स्वीकारला पदभार
अर्जुनवाड : अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथील केंद्रीय जल आयोग कार्यालय प्रमुखाचा तात्पुरता कार्यभार उध्दव मगदूम यांनी स्वीकारला. निरीक्षक आय. यु. मोमीन हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा पदभार मगदूम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. मगदूम यांनी २००५, २००६, २००७ व २०१९ च्या कृष्णा नदीच्या महापुरात वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांच्या मदतीने चांगले काम केले होते. पदभार स्वीकारताना राहुल डोंगरे, गणेश डोंगरे उपस्थित होते.