कोल्हापूर 6 : सार्वजनिक गणेश विसर्जनामध्ये पंचगंगा नदी घाटावर ४८० हून अधिक गणेश मंडळांचे मुर्ती विसर्जित करण्यात आल्या तर मुर्ती दानला चांगला प्रतिसाद लाभला. यंदा गणेश मंडळाचे ८३ व घरगुती मुर्ती २९ अशा एकूण ११२ गणेश मुर्ती बुधवारी दान झाल्या. यासाठी महापालिकेने स्वतंत्र मंडप उभा करण्यात आला. याचबरोबर महापालिका अग्निशमन दल,जीवन ज्योत, व्हॉईट आर्मीचे जवानांसह तराफाच्या सहाय्याने नदी पात्रात गणेश मुर्ती विसर्जित केल्या.
पंचगंगा नदीवर काल (मंगळवारी) सकाळी ८.३० वा.च्या सुमारास सुधाकर जोशी नगर येथील एकी तरुण मंडळांची पहिली गणेश मुर्ती विसर्जित झाली. सकाळपासून गणेश मंडळाच्या मुर्ती बाहेर पडल्या होत्या. त्यामुळे दूपारी १२ वा. पर्यंत पंचगंगेत ६५ गणेश मंडळाच्या मुर्ती विसर्जित झाल्या होत्या. तसेच पाच गणेश मुर्तीदान झाल्या. दूपारी एक नंतर मिरवणूक संथ गतीने येऊ लागली.
साधारणत : तीन नंतर मंडळाचा जोर वाढला. सायंकाळी सहाच्या सुमारास ३११ मुर्ती विसर्जित झाल्या आणि घरगुती १८ व मंडळाचे गणेश मुर्ती ५६ अशा एकूण ७४ मुर्ती विसर्जित झाल्या. यावेळी महापालिका मंडपवर अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
याचसुमारास गणेश भक्तांची गर्दी नदी घाटावर वाढली. दरम्यान, कोणतीही आपत्ती घटना घडू नये यासाठी महापालिकेचा अग्निशमन दल, व्हॉईट आमीचे जवान याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. त्यासाठी तराफा,बोट,दोरी आदी साहित्य आणले होते. साधारणत : रात्री १२ वाजेपर्यंत अशीच वाढती गर्दी होती. पण, मध्यरात्री तो कमी झाला.
गणेश मुर्ती दानसाठी महापालिकेने दोन कुंड ठेवले होते तर मुर्तीसाठी भव्य असा मंडप उभे केले होते.बुधवारी सकाळी ६.३० वा. पर्यंत ४६५ गणेश मंडळांच्या मुर्ती विसर्जित झाल्या होत्या तर ७९ गणेश मंडळे व २९ घरगुती गणेशमुर्ती दान झाल्या होत्या. सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास गणेश विसर्जन पूर्ण झाले.