जिल्ह्यात सर्वाधिक ३१३ नवे कोरोना रुग्ण कोल्हापूर शहरामध्ये नोंदविण्यात आले आहेत. त्याखालोखाल करवीर तालुक्यात १६५ रुग्ण तर शिरोळ तालुक्यात १५१ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रात ९१ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत नवे रुग्ण आढळले आहेत.
दिवसभरामध्ये १८४१ जणांची तपासणी करण्यात आली असून २५९९ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १५८७ जणांची अँटिजेन चाचणी करण्यात आली आहे.
चौकट
नगरपालिका क्षेत्रात दिलासा
इचलकरंजी ९१, जयसिंगपूर ११, कागल ७ रुग्णवगळता कुरुंदवाड, गडहिंग्लज, शिरोळ, हुपरी, पेठवडगाव, मलकापूर, मुरगूड या नगरपालिका क्षेत्रात नवा एकही रुग्ण सापडलेला नाही.
चौकट
हातकणंगले तालुक्यात ११ मृत्यू
इचलकरंजीसह हातकणंगले तालुक्यात गेल्या २४ तासांत ११ जणांचे मृत्यू झाले आहेत.
कोल्हापूर ०७
संभाजीनगर, न्यू पॅलेस, शिवाजी पेठ, कळंबा २, कदमवाडी, सानेगुरुजी वसाहत
इचलकरंजी ०५
शहापूर २, इचलकरंजी २, यशवंत कॉलनी
हातकणंगले ०६
किणी, चंदूर कोरोची, नागाव, हुपरी २
करवीर ०४
दऱ्याचे वडगाव, तामगव, गांधीनगर, दिंडनेर्ली
शिरोळ ०४
जयसिंगपूर ०२, कुरुंदवाड, दानोळी
चंदगड ०१
देवरवाडी
पन्हाळा ०२
कसबा ठाणे, जोतिबा
शाहूवाडी ०१
भेडसगाव
गडहिंग्लज ०२
अत्याळ, महागाव
आजरा ०१
वडकशिवाले
इतर जिल्हे
हंचनाळ चिक्कोडी, मुरूड दापोली, दापोली, सांगलीवाडी, मंगळवेढा, बागणी, मलकापूर कऱ्हाड