कोल्हापूर :लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यांतर्गत सुरू करण्यात आलेल्या एसटी बसेसच्या माध्यमातून काल दिवसभरात जिल्हयातील ११ आगारातील ३५ बसच्या ८० फेऱ्यातून १ हजार १८० प्रवाशांनी प्रवास केला असून ५६ हजार ११६ रूपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी आज दिली.कोल्हापूर आगाराच्या कोल्हापूर-जयसिंगपूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ८७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २ हजार ५७० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-इचलकरंजी मार्गावर एका बसच्या ८ फेऱ्यातून १०७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ५ हजार ३० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून २४ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६ हजार २९१ रूपयांचे उत्पन्न मिळाले.संभाजीनगर आगाराच्या रंकाळा-हुपरी मार्गावर ३ बसेसच्या १२ फेऱ्यातून १८३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ६९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. इचलकरंजी आगाराच्या इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या १८ फेऱ्यातून ३०२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १० हजार ५२० रूपयांचे उत्पन्न मिळाले.
गडहिंग्लज आगाराच्या गडहिंग्लज-कोल्हापूर मार्गावर ४ बसेसच्या ८ फेऱ्यातून १४२ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १५ हजार ७७५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. गारगोटी आगाराच्या गारगोटी-कोल्हापूर मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ६५ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४ हजार ११० रूपयांचे उत्पन्न मिळाले.
गारगोटी-मुरगूड-कोल्हापूर मार्गावर एका बसेसच्या एका फेरीतून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. कोल्हापूर-मुरगूड मार्गावर एका फेरीतून फेऱ्यातून १३ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ६५० रूपयांचे उत्पन्न मिळाले. चंदगड आगाराच्या चंदगड-गडहिंग्लज मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून २८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २९५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.कुरूंदवाड आगाराच्या कुरूंदवाड-जयसिंगपूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून २१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये २६० रूपयांचे उत्पन्न मिळाले. कुरूंदवाड-कोल्हापूर मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ७७ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ३ हजार ४२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले.
कागल आगाराच्या कागल-रंकाळा मार्गावर २ बसेसच्या ४ फेऱ्यातून ३८ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ८८५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. राधानगरी आगाराच्या कोल्हापूर-राधानगरी मार्गावर एका बसच्या २ फेऱ्यातून ३६ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये १ हजार ६२५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. आजरा आगाराच्या आजरा सोहाळे सुतगिरण मार्गावर एका बसच्या ४ फेऱ्यातून ५१ प्रवाशांनी प्रवास केला, यामध्ये ४९० रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याचेही पलंगे म्हणाले.