मोहन सातपुते ।लोकमत न्यूज नेटवर्कउचगाव : पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्ग व अन्य राज्य महामार्गांवर हेल्मेट न वापरल्याने गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून आठ महिन्यांत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेटचा वापर न करता उघड्या डोक्यांनी दुचाकी चालवणाऱ्यांनी खबरदारी न घेतल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत, तर कुटुंबही उद्ध्वस्त झाले आहे. महामार्गावर व अन्य राज्य महामार्गावर जीवघेण्या अपघातात मृत्युमुखी पडणाºयांच्या संसाराची वाताहत झाली आहे.चारचाकी वाहनचालक व मोटारसायकलवरून जाणाºया वाहनचालकांनी खबरदारी घेऊन वेळीच या जीवघेण्या महामार्गावरून मोटारसायकल चालविताना हेल्मेटचा व चारचाकी चालविताना सीटबेल्टचा वापर केला आणि काळजी घेतली तर अपघातातून वाचण्याची शक्यता नाकारता येत नाही.अत्यंत रहदारीचा मार्ग म्हणजे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग होय. या महामार्गावर फेब्रुवारी २०१८ पासून वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात मोटारसायकलवरून जाणाºया वाहनचालकांचा हेल्मेट न वापरल्याने मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने उजळाईवाडी एक, तावडे हॉटेल एक, शिरोली तीन, अंबप फाटा एक, कागल एक, वाकरे फाटा तीन, अन्य ठिकाणी एक असे बाराजणांवर हेल्मेट न वापरल्याने अपघातात काळाने झडप घातली. त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मोठा आघात सहन करावा लागत आहे.चारचाकी वाहनचालकांकडून हलगर्जीपणाने सीटबेल्ट न वापरल्यामुळे मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत दोन हजार चारचाकी वाहनधारकांकडून चार लाख रुपयांचा (महसूल स्वरूपात) दंड जमा झाला आहे, तर दुचाकीधारकांनी हेल्मेट न वापरल्यामुळे मार्च २०१८ ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३८ दुचाकीधारकांकडून एकोणीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरीही अपघाताला धोकादायक ठरू शकेल असे वर्तन करत वाहन चालवीत आहेत. वाहनधारकांची मानसिकता बदलणे आणि त्यांचे प्रबोधन करण्याचे काम उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या वतीने सुरू आहे.
हेल्मेट न वापरल्याने आठ महिन्यांत १२ जणांचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 1:00 AM