कोल्हापूर : कोल्हापुरात रविवारी कोरोनाचे नवे १२ रुग्ण आढळले. यात महानगरपालिका क्षेत्रातील दहा, तर चंदगड व राधानगरीमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या नव्या रुग्णसंख्येमुळे कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या १६० वर पोहोचली आहे. दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची गेल्या दहा महिन्यांतील संख्या ५० हजार १८६ वर पोहोचली. यापैकी ४८ हजार १९० जणांवर यशस्वी उपचार होऊन ते कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेरपर्यंत १७३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रविवारी संध्याकाळी पाचपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे ३९० प्राप्त अहवालापैकी ३७५ अहवाल निगेटिव्ह, तर ८ अहवाल पॉझिटिव्ह आले. ॲन्टिजेन टेस्टिंग चाचणीचे २८ प्राप्त अहवालापैकी सर्व अहवाल निगेटिव्ह आले. खासगी रुग्णालये, लॅबमध्ये ९२ प्राप्त अहवालांपैकी ८८ निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह असे एकूण १२ अहवाल पॉझिटिव्ह आहेत.