शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

१२ हजार कामगार लाभांपासून वंचित

By admin | Published: December 24, 2014 11:42 PM

सेवापुस्तकांचा घोळ : प्रशासनाचे बोटचेपे धोरण

प्रवीण देसाई - कोल्हापूर -सेवापुस्तकांच्या नूतनीकरणाच्या घोळात जिल्ह्यातील सुमारे १२ हजार बांधकाम कामगारांवर लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यासाठी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाचे बोटचेपे धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या निर्देशानुसार दिल्या जाणाऱ्या लाभांना या कामगारांना मुकावे लागत आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत बांधकाम कामगारांची संख्या ४४ हजार आहे.कामगारांना ज्यामुळे लाभ मिळू शकतात, त्या सेवापुस्तकांचे नूतनीकरण करण्याचा कालावधी १५ महिन्यांचा आहे. पंधरा महिने पूर्ण झाल्यानंतर कामगारांनी वारंवार सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून नूतनीकरणाबाबत मागणी केली; परंतु प्रत्येक वेळी कुठले ना कुठले कारण सांगून या कार्यालयाने त्याबाबत टाळाटाळच केली आहे. याबाबत सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला कळविले आहे. त्यांच्याकडून नवीन सेवापुस्तक काढा किंवा मुंबइतून नूतनीकरण करून या, अशी उत्तरे दिली जातात. नवीन सभासदासाठी ८५ रुपये, तर नूतनीकरणासाठी ६० रुपये शुल्क आहे. सेवापुस्तकाच्या कागदपत्रांची यादी क्लिष्ट आहे. ती जमवतानाच दमछाक होते. त्यातच नवीन पुस्तक काढणे त्रासदायक ठरणार आहे. सेवापुस्तकांचे नूतनीकरण ज्या-त्या भागात व्हावे यासाठी प्रत्येक तालुक्याला महिन्यातून दोन वेळा शिबिरे घेतली जाणार आहेत. मुळातच या कार्यालयात चार क्लार्क आहेत. मूळ कामामध्ये २७ कामगार कायद्यांसह इतर विषय येतात. त्यामध्ये कामगार कल्याण मंडळाचे अतिरिक्त काम आल्याने नूतनीकरणासारखी कामे वेळेत करणे शक्य होत नाही. - सुहास कदम, सहायक कामगार आयुक्तसेवापुस्तकांच्या नूतनीकरणासंदर्भात वेळोवेळी सहायक कामगार आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधला आहे. कामगारांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिलेले आहे; परंतु अपुऱ्या कर्मचाऱ्यांची सबब पुढे करीत याबाबत टाळाटाळ सुरू आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे.- कॉ. जोतिराम मोरे, जिल्हा उपाध्यक्ष, महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनाबांधकाम कामगारांना मिळणारे लाभकामगाराची पत्नी किंवा बांधकाम कामगार महिला गर्भवती असल्यास नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास १० हजार रुपये व सिझेरियन झाल्यास १५ हजार रुपयेकामगारांच्या पाल्यांना इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वार्षिक १२०० रुपये शिष्यवृत्ती. इयत्ता आठवी ते १० वीपर्यंत २४०० रुपये, ११वी ते पुढील शिक्षणासाठी २००० पासून ३५ हजार रुपये शिष्यवृत्ती वर्षाला कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास शासनाकडून दोन लाख रुपये मिळतात; तर काम करताना अपंगत्व आल्यास १ लाख रुपये.कामगारांच्या विवाहासाठी १० हजार रुपयेक्षयरोग, कर्करोग, आदी दुर्धर आजार असल्यास उपचारांसाठी २५ हजार रुपये.नैसर्गिक मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी पाच हजार रुपयेकामगाराचा मृत्यू झाल्यास वारसांना वर्षाला १२ हजार रुपयांची पेन्शन.