शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

फिरंगाई तालमीच्या १२१ जणांचा... प्रेरणादायी उपक्रम : २४२ अंधांना मिळेल दृष्टी

By admin | Published: January 28, 2015 11:58 PM

मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

कोल्हापूर : शतकमहोत्सवी वर्ष साजरा करत असलेल्या शिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाच्या १२१ कार्यकर्त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. तालमीच्या कार्यकर्त्यांनी शतकमहोत्सवी वर्षानिमित्त केलेला हा संकल्प म्हणजे २४२ अंधांच्या जीवनात प्रकाश देणारा असा आहे, असे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी येथे बोलताना काढले. आमदार राजेश क्षीरसागर यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. एखाद्या मंडळाचे कार्यकर्ते एवढ्या मोठ्या संख्येने नेत्रदानाचा संकल्प करतात हा राज्यातील सार्वजनिक मंडळांना प्रेरणा देणारा असून आपल्या आयुष्यात असे दानशूर कार्यकर्ते मी यापूर्वी कधीही पाहिले नाहीत. या कार्यकर्त्यांना अंधबांधवांचा दुवा मिळेल, असेही खासदार महाडिक म्हणाले. यावेळी नेत्रदानाचा संकल्प करणाऱ्या कार्यकर्त्यांनी भरून दिलेली संकल्पपत्रे नेत्रपेढीकडे देण्यात आली.यावेळी तालमीचे अध्यक्ष नगरसेवक रवीकिरण इंगवले, भाजपचे नेते रामभाऊ चव्हाण, भाजपचे महानगर अध्यक्ष महेश जाधव,माजी नगरसेवक सुहास लटोरे, दत्तम इंगवले, जयेश कदम, सराफ संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, माजी नगरसेवक अजित राऊत आदी उपस्थित होते.