शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

जिल्ह्यातील १२३ गावांनी कोरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 4:24 AM

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदले आहेत.

जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये उच्चांकी अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १२२५ गावे असून, १०२५ ग्रामपंचायती आहेत. सुरुवातीच्या काळात ही संख्या ग्रामीण भागातही नियंत्रणामध्ये होती. परंतु पुण्या, मुंबईहून आलेले ग्रामस्थ, नागरिकांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ही संख्या वाढत गेली. अनेकांना गावातील शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. यातही काहींनी दबाव टाकून घरात राहण्याला प्राधान्य दिले. यावरून गावोगावी मतभेद आणि वादही झाले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले.

चौकट

जिल्ह्यातील कोरोना पहिल्या रुग्णाची नोंद २६ मार्च २०२०

सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण १२६९

ग्रामीण रुग्ण २५ हजार ५११

एकूण मृत्यू १७९४

कोरोनातून बरे झालेले रुग्ण ४९ हजार ९२२

जिल्ह्यातील एकूण गावे १२२५

या गावात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण १२३

चौकट

रुग्ण नसलेली बहुतांशी गावे डोंगराळ

या १२३ गावांमध्ये बहुतांशी गावे ही त्या त्या तालुक्यातील डोंगराळ भागातील आहेत. ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही अशी ही गावे आहेत. गडहिंग्लज ९, शाहूवाडी १२, कागल ३, भुदरगड ३०, आजरा १६, करवीर ८, चंदगड ११, पन्हाळा ११, राधानगरी ७, गगनबावडा १६ अशी ही एकही कोरोना रुग्ण नसलेली गावे आहेत.

कोट

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन आणि शासनाच्या सूचनांचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो. मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना शाळा व शेतातील घरांमध्ये अलगीकरण केल्यामुळे देऊळवाडी, सातेवाडी या गावांत आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही. सध्याही ग्रामसमिती कार्यरत असून, या पुढच्या काळातही कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा आमचा निर्धार आहे.

नंदा शंकर पोतनीस, सरपंच देऊळवाडी, सातेवाडी, ता. आजरा

०७०४२०२१ कोल नंदा पोतनीस

कोट

कोरोना काळात शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक आणि सात दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या. तसेच इतर गावांतील नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला. ग्रामपंचायत व दक्षता समितीतर्फे प्रत्येक ग्रामस्थाची, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. याकामी ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले.

भरमू जाधव, सरपंच बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज

०७०४२०२१ कोल भरमू जाधव