कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची आणि मृतांची संख्या वाढतच असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत नवे १२५० रुग्ण सापडले आहेत. गेल्या सहा महिन्यांतील ही उच्चांकी संख्या आहे. ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले तरी, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक ३०३ कोरोनाचे रुग्ण सापडले असून त्याखालोखाल करवीर तालुक्यात १६४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आजरा तालुक्यात ११७ नव्या रुग्णांची भर पडली असून इचलकरंजीमध्ये ९६ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरामध्ये १८६४ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २५४८ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. १६४० जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली आहे, तर ९३५९ जणांवर उपचार सुरू आहेत.
एकीकडे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गेल्या दोन महिन्यांतील मृतांचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एप्रिलच्या शेवटच्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले आहेत.
चौकट
सर्वाधिक मृत कोल्हापूर शहरातील
कोल्हापूर ०९
आपटेनगर, शाहू मंदिर, यादवनगर, शिवाजी पेठ ०२, रामानंदनगर, पायमल वसाहत, शाहूनगर, टाकाळा
हातकणंगले ०८
शहापूर, कबनूर ०२, खोत गल्ली शिरोली, रुकडी, नागाव ०२, अंबप
शिरोळ ०५
यड्राव, जांभळी, दानोळी, शिरोळ, जयसिंगपूर
करवीर ०४
शिंगणापूर ०२, भुये, वसगडे
पन्हाळा ०२
सातवे, पन्हाळा
इचलकरंजी ०२
कागल ०१
शाहूूवाडी ०१
बांबवडे
गडहिंग्लज ०१
नरवडे
राधानगरी ०१
दाजीपूर
इतर जिल्हे ०५
देगाव पंढरपूर, मंगळवेढा, इस्लामपूर, दापोली, पडवाडी (ता. वाळवा, जि. सांगली)