शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

‘निर्भया’चा १२६ तरुणांना दणका

By admin | Published: August 17, 2016 11:45 PM

‘खाकीचा प्रसाद’ : रेकॉर्डवर येणाऱ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; तरुणी, महिला सुरक्षेसाठी पथक

एकनाथ पाटील -- कोल्हापूर --शहरातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या १२० तरुणांना ‘निर्भया’ पथकाने ‘खाकीचा प्रसाद’ दिला आहे. कॉलेजला जातो, म्हणून घरातून बाहेर पडलेल्या मुलांचे पराक्रम पाहून पालकवर्गाला चिंता लागली आहे. रेकॉर्डवर येणाऱ्या अशा तरुणांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वत:ला वेळीच सावरावे, असे मत पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४६ पोलिस ठाण्यांमध्ये तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८ आॅगस्टला ‘निर्भया’ पथकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यांमध्ये दहा पथके तैनात करण्यात आली. त्यामध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांना स्वतंत्र ड्रेसकोड व दिमतीला वेगवान दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्यांना ‘सळो की पळो’ करून सोडण्याचे आदेशही पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी दिले आहेत. या निर्भया पथकामुळे तरुणी व महिलांना आपण घराबाहेर पडल्यानंतर परत घरी येईपर्यंत सुरक्षित आहोत, ही भावना निर्माण झाली पाहिजे, अशा पद्धतीचे भयमुक्त वातावरण सर्वत्र पाहायला मिळाले पाहिजे हा मुख्य उद्देश ‘निर्भया’ पथकाच्या कामगिरीचा आहे. ‘निर्भया’ पथकाने आठ दिवसांत जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणींची छेड काढणे, टाँटिंग करणे, रस्ता अडवणे, पाठलाग करणे, हातवारे करणे अशा १२६ तरुणांना खाकीचा प्रसाद देत कारवाई केली आहे. अतिशय हुशारीने पथके कारवाई करत आहे. त्यांच्या कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करत असल्याचे व्हिडीओ शूटिंग करून त्याला रंगेहात पकडले जाते. पथकाच्या सर्व्हेनुसार ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालयीन तरुणींची बसस्टॉप, एस. टी. बस, कॉलेज कॅम्पस आदी ठिकाणी छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे. पथकाची नजर : या ठिकाणावर राहणार कायमस्वरूपी वॉचविवेकानंद कॉलेज (पानटपरी), शहाजी कॉलेज (दसरा चौक), महावीर कॉलेज (बसस्टॉप), कॉमर्स कॉलेज, बिंदू चौक, आझाद चौक, शाहू मैदान, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, विद्यापीठ हायस्कूल, भवानी मंडप, शिवाजी चौक बसस्टॉप, गंगावेश बसस्टॉप, के.एम.सी. कॉलेज, न्यू कॉलेज (परिसर), पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमती गर्ल्स हायस्कूल चौक, भोई गल्ली, एनसीसी भवन परिसर, शिवाजी विद्यापीठ परिसर, केआयटी कॉलेजकडे जाणारा रस्ता व भारती विद्यापीठ परिसर, रंकाळा परिसर, महावीर गार्डन यासह कॉलेज परिसरातील पानटपरी, हॉटेल, आइस्क्रीम पार्लर, कँटिन. या कलमाखाली होते कारवाई सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन व छेडछाड करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलिस अ‍ॅक्ट ११०/११७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. या कलमाखाली कारवाई होणाऱ्या तरुणांची पोलिस रेकॉर्डला नोंद होऊन त्यांच्या हालचालींवर नेहमी पथक लक्ष ठेवून असणार आहे. ‘‘िनिर्भया’ पथकाची बैठक निर्भया’ पथकाची बुधवारी पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी बैठक घेतली. यावेळी आठ दिवसांच्या कारवाईचा आढावा घेत दुसऱ्या टप्प्यातील कारवाईचे नियोजन करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षकांसह निरीक्षक व पथकातील अधिकारी, कर्मचारी व ‘कोल्हापूर वुई केअर’च्या तीस महिला सदस्या उपस्थित होत्या.