कोल्हापूर : महापुराचे पाणी ओसरलेल्या भागातून २१० डंपर व ट्रॅक्टर खेपांद्वारे दिवसभरात सुमारे १२६० टन कचरा व गाळ उठाव केला.
महानगरपालिका आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील कचरा व गाळ उठाव करून औषध फवारणी व धूर फवारणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेकडून आलेल्या दोन जेटिंग कम सक्शन वाहने याद्वारे प्रमुख ड्रेनेज लाईन साफ करणे व चोकअप काढण्याचे काम सुरू आहे.पुणे महानगरपालिकेच्या दोन फायर फायटर व ३६ कर्मचारी, देवस्थान समितीचे ६० कर्मचारी यांच्या साहाय्याने शहरात पूर ओसरलेल्या ठिकाणी साचलेला गाळ व कचरा उठाव केला. यानंतर त्याठिकाणी औषध फवारणी, धूर फवारणी केली.या भागात राबविली स्वच्छता...रिलायन्स मॉल पाठीमागील बाजू, डिगे पॅसेज, लक्ष्मीपुरी कामगार चाळ, चावरेकर चाळ, मोकाशी पॅसेज, फोर्ड कॉर्नर, कोंडा ओळ, सीपीआर चौक ते शिवाजी पूल, पिकनिक पॉईट, पंचगंगा हॉस्पिटल ते गायकवाड पुतळा, शाहू विद्यालय, विवेकानंद कॉलेज, दुधाळी पॅव्हेलियन मागील बाजू, एमएससीबी रोड, गिरिजा चौक, कोल्हापूर आर्थोपेडिक सेंटर, पानेरी मळा, शिंगणापूर नाका, आखरी रास्ता, गुने बोळ, पंचगंगा रोड, शाहूपुरी ६ ते ९ गल्ली, व्हिल्सन पूल ते व्हिनस कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते खानविलकर पेट्रोल पंप, जिल्हाधिकारी कार्यालय रोड ते पाटील गॅस एजन्सी रोड, नागाळा पार्क, केव्हीज पार्क, रमणमळा, पोवार मळा, नागाळा पार्क, महावीर कॉलेज रोड, शिये नाका रोड, बापट कॅम्प, शिरोली टोलनाका, तावडे हॉटेल परिसर, लोणार वसाहत, मुक्त सैनिक, आदी ठिकाणी कचरा व गाळ उठाव करून स्वच्छता केली.