कोल्हापूर : माध्यमिक शिक्षक पतपेढीची आर्थिक वर्षात एकत्रित १२९ कोटींची वार्षिक उलाढाल झाली असून, पतपेढीच्या पाच दशकांतील हा विक्रमी व्यवसाय आहे. सभासदांना १४ टक्के लाभांशाची शिफारस केली आहे, असे प्रतिपादन कोजिमाशि पतपेढीचे चेअरमन शंकर पाटील यांनी केले. ते पतपेढीच्या ५३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी बोलत होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, पतपेढीने चालू आर्थिक वर्षात ३२ कोटींचा ठेवीचा टप्पा पूर्ण करीत २९ कोटींचे कर्ज वितरण केले आहे. याशिवाय १४ कोटींची गुंतवणूक केली आहे. सभासदांकरिता नवीन सुरू करण्यात आलेल्या योजनांचा लाभ घेण्यात यावा. पतपेढीने तरतुदी करून आर्थिक स्थैर्य देऊन पतपेढीस वैभव प्राप्त करून दिल्याने अनेक सभासदांनी संचालक मंडळाचे अभिनंदन केले.
व्यवस्थापक अभय व्हनवाडे यांनी नोटीस वाचन केले. वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे संचालक तानाजी पाटील, सुप्रिया शिंदे, महादेव चौगले, प्रकाश वरेकर, आर. एस. पाटील, राजगोंडा पाटील, एल. डी. पाटील, मनोहर पाटील, सदाशिव चौगले, मनीषा खोत, सुनीता पाटील, अरुण कांबळे, व्ही. के. शिंदे यांनी दिली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी व्हीसीद्वारे सहभाग नोंदवला. आभार उपाध्यक्ष शिवाजी लोंढे यांनी मानले.