कोल्हापूर : अतितापामुळे श्रावणी अरुण पाटील, (वय १८, रा. दुसरा बस स्टॉप, फुलेवाडी) या बारावीत शिकणाऱ्या तरुणीचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. श्रावणीच्या या मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.श्रावणीची सध्या बारावीची परीक्षा सुरू होती. ती शिवाजी पेठेतील महाविद्यालयात शिकत होती. उर्वरित विषयांचा तिचा अभ्यास सुरू होता. मात्र चार दिवसांपूर्वी तिला ताप, सर्दी, खोकला असा मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाला. त्यामुळे तिला फुलेवाडीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिला रविवारी सकाळीच घरी सोडण्यात आले.परंतु सोमवारी रात्री पुन्हा तिला ताप आला. रात्री उशिरा तिला सीपीआरमध्ये दाखल करण्यासाठी आणले जात असतानाच ती बेशुध्द पडली आणि तिचा मृत्यू झाला. डोळ्यादेखत मुलीचा मृत्यू झाल्याने आईवडिलांनी हंबरडा फोडला.
बारावीतील तरुणीचा अतितापामुळे मृत्यू, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2023 12:46 PM