इचलकरंजी (जि.कोल्हापूर) : बनावट पावत्या बँकेत तारण ठेवून, खोटी कागदपत्रे, खोट्या नोंदी आणि वखार महामंडळाच्या गोदामाचे भाडे बुडवून शासनाची तब्बल १३ कोटी ४१ लाख ७१ हजार ८६६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात वखार महामंडळाचे निलंबित सहायक साठा अधीक्षक तथा इचलकरंजी केंद्रप्रमुखांसह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी अकराजणांना अटक करण्यात आली असून त्या सर्वांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.याबाबत महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर तृप्ती हणमंत कोळकर यांनी तक्रार दिली आहे.निलंबित सहायक साठा अधीक्षक तथा केंद्रप्रमुख इचलकरंजी महंमद शाबुद्दीन पेंढारी, चंद्रकांत नानासाहेब मगर , ज्ञानेश्वर नारायण पेठकर, यश सुधीर जाधव, कुमार दशरथ जाधव, श्रेयस संजय माने, रज्जाक नूरमहम्मद मोठलानी, तय्यब रज्जाक मोठलानी, जयंत नरहर व्यास, आनंदा बाबूराव जाधव, सुशांत माणिकराव कोळेकर, कृष्णात पोपट फारने, महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी ताकारी इरफान तय्यब मोठलानी, मयूर विठ्ठल भोसले , पोपट मुरलीधर पाटील, प्रल्हाद बाबूराव जाधव, साहेबराव बबन आडके , तानाजी आनंदा मराळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Kolhapur: वखार महामंडळाच्या माध्यमातून शासनाची १३ कोटी ४१ लाखांची फसवणूक; अकरा जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 1:00 PM