मुरगूड : येथील श्री व्यापारी नागरी सह पतसंस्थेची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. आर्थिक वर्षात सभासदांना १३ टक्के लाभांश वाटप केले असून, अहवाल सालात ५२ कोटी १३ लाखांचा एकूण व्यवहार झाला, तर संस्थेकडे १३ कोटी २५ लाखांच्या ठेवी असल्याची माहिती अध्यक्ष प्रशांत शहा यांनी दिली.
यावेळी संस्था सभासदांच्या १०वी बोर्ड परीक्षेततील तन्मय कांबळे, सिफा जमादार, प्रतीक अस्वले यांचा, तर १२वीबोर्ड परीक्षेतील सेजल शिंदे, श्रेयांश हुंडेकर, प्रणव बरकाळे, रचना व्हनबट्टे या पाल्यांचा यथोचित पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांनी अहवाल वाचन केले.
यावेळी हिंदूराव सूर्यवंशी, श्रीकांत खोपडे, नवनाथ डवरी, राजाराम कुडवे आदी सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी उपसभापती प्रकाश सणगर, साताप्पा पाटील, धोंडीराम मकानदार, किरण गवाणकर, किशोर पोतदार, नामदेव पाटील, शशिकांत दरेकर, प्रदीप वेसणेकर, यशवंत परीट, संदीप कांबळे, संगीता नेसरीकर, रोहिणी तांबट, सुरेश जाधव, महादेव तांबट यांच्यासह सभासद वर्ग उपस्थित होता. उपसभापती प्रकाश सणगर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन चंद्रकांत माळवदे यांनी केले, तर आभार संचालक सुरेश जाधव यांनी मानले.
फोटो ओळ : मुरगूड येथील व्यापारी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना अध्क्ष प्रशांत शहा