शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

१३ जणांवर ‘शॅडो वॉच’

By admin | Published: June 19, 2016 1:23 AM

वीरेंद्र तावडे प्रकरण : हिंदुत्ववादी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

कोल्हापूर : ‘अंनिस’चे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी संशयित म्हणून अटक केलेला हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता डॉ. वीरेंद्र तावडे याचा कोल्हापुरातील कोणा-कोणाशी संपर्क आहे, या दृष्टीने कोल्हापूर पोलिस तपास करीत आहेत. याप्रकरणी १३ जणांवर पोलिसांनी ‘शॅडो वॉच’ ठेवला आहे. या शॅडो वॉचमध्ये काही हिंदुत्ववादी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात पनवेल येथून ‘सीबीआय’ने संशयित डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. सध्या तो पुणे येथील पोलिस कोठडीत असून उद्या, सोमवारी त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपणार आहे. दरम्यान, गोविंद पानसरे हत्येप्रकरणाच्या चौकशीसाठी कोल्हापूर पोलिस तावडेला ताब्यात घेणार आहेत. पानसरे हत्येप्रकरणी तपासावेळी संशयित आरोपी समीर गायकवाडच्या चौकशीवेळी वीरेंद्र तावडे याचे नाव आले होते. त्यामुळे पोलिस तावडेचे कोल्हापुरात कोणा-कोणाशी संबंध आहेत, दाभोलकर हत्येपूर्वी व त्यानंतर त्याने कोणा-कोणाशी फोनवरून संभाषण केले आहे, या दृष्टीने तपास करीत आहेत. त्यामुळे कोल्हापूर, इचलकरंजी, आदी परिसरांतील १३ जणांवर पोलिसांनी शॅडो वॉच ठेवला आहे. यामध्ये पोलिस वेळप्रसंगी गेल्या तीन वर्षांतील संबंधितांचे कॉल डिटेल्स तपासणार आहेत. कोल्हापूर पोलिसांनी तावडेला ताब्यात घेतल्यानंतर पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे. साडविलकर यांना पोलिस बंदोबस्त कोल्हापुरात पूर्वी हिंदुत्ववादी संघटनेत काम केलेला संजय साडविलकर हे दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदार आहेत. याची दखल घेऊन पोलिस प्रशासनाने शनिवारपासून त्यांना बंदोबस्त दिला आहे. त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्रधारी पोलिस नेमल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.(प्रतिनिधी)