कंपनी सेक्रेटरी (सी. एस.) अभ्यासक्रमाच्या प्रोफेशनल या अंतिम परीक्षेत रोमा गुप्ता, अभिजित संभाजी करंबे, सोनिया महाजन, अपूर्वा परांजपे, रोहित कुलकर्णी, रूची कुंभोजकर, झिनत लकडावाला, फिजा मुजावर, लिजा मेहता उत्तीर्ण झाल्या. एक्झिक्युटिव्हच्या परीक्षेत विनय संकपाळ, केतकी लाड, आदिती डाके, सुस्मिता पवार, आदी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना ‘आयसीएसआय कोल्हापूर चॅप्टर’चे अध्यक्ष अमित पाटील, सचिव ऐश्वर्या तोरस्कर, वृषाली चौगुले, स्नेहलता पाटील, पारस रोकडे, आदींचे मार्गदर्शन लाभले. अभिजित करंबे यांना सीएस स्वप्निल पाटोळे, सीए नीलेश भालकर, राघवेंद्र बकरे, सीएस मन्मय आणि किमया कल्याणकर यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, कोल्हापूर विभागातील सहा जिल्ह्यांतील सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढला असल्याचे अमित पाटील यांनी सांगितले.
फोटो (२५०२२०२१-कोल-अभिजित करंबे (सीएस)