मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात पहिल्या लाटेत ३ तर दुसऱ्या लाटेत १३ गावामध्ये कोरोनाचा अद्यापही शिरकाव झालेला नाही. तालुक्यात ४० पेक्षा जास्त कोरोनाबधित रुग्ण असणारी ८ गावे आहेत. ३९ गावांत मधील ६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन महिन्यांत कोरोनामुक्तीचे प्रमाण ८७ टक्के इतके आहे. बांबवडे, भेडसगाव, सुपात्रेपैकी हणमंतवाडी, मलकापूर, ओकोली, सरूड, शित्तूर तर्फे मलकापूर, शाहूवाडी या गावांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून या गावांना भीती अधिक आहे.
शाहूवाडी तालुक्यात गेल्यावर्षी उचत गावापासून सुरू झालेला कोरोना अद्यापही थांबलेला नाही . सध्या वाढलेली पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या व मृत्यूचे वाढलेले प्रमाण पाहता सर्वत्र भितीचे वातावरण आहे. ग्रामसुरक्षा समिती व शासनातर्फे केले जाणारे विविध प्रयत्न यांना नागरिकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे . तालुक्यात सध्या ३ ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सर्वच ठिकाणी ऑक्सिजनची सोय आहे पण व्हेंटिलेटरची नाही. त्यामुळे कोल्हापूर या ठिकाणी जावे लागत आहे. त्यातच हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरूच आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणारे अनेक रुग्ण गावातच फिरत राहिल्याने व शेवटच्या टप्यात कोविड सेंटरला दाखल होत असल्याने मृत्यूचे प्रमाण तालुक्यात वाढले आहे.
- एप्रिल, मे महिन्यात आकडेवारी
कोरोनामुक्त - ९००
पॉझिटिव्ह रुग्ण ११००
बधित रुग्ण ... १६१५
उपचारानंतर नंतर घरी सोडले .. १२२३
निगेटिव्ह ...... १२५२
मृत्यू ..... ६३
बरे होण्याचे प्रमाण ... ८७ %
पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा शिरकाव न झालेली गावे - घोळसवडे , सावर्डी ' म्हाळसावडे ,
४० पेक्षा जास्त रुग्ण असणारी गावे - बांबवडे, भेडसगाव, मलकापूर, ओकोली, सरुड, शाहूवाडी, शित्तूर तर्फे मलकापूर, सुपात्रेपैकी हणमंतवाडी,
- दोन महिन्यांत ३९ गावांत ६३ जणांचा मृत्यू.