कोल्हापूर : जिल्ह्यातील मृत्यूचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, ५३ कोरोनाग्रस्तांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला आहे. नवे १३०९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ८७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.कोल्हापूर शहरात ४२७ रुग्ण आढळले असून, करवीर तालुक्यात २११, तर हातकणंगले तालुक्यात १५७ रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी येथे नव्या १०३ रुग्णांची नोंद झाली असून, इतर राज्यातील व जिल्ह्यातील १२६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आले आहेत.
रुग्णांची संख्या वाढतीच असून, मृत्युदरही रोखण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे. बुधवारीच राज्याच्या टास्क फोर्सने कोल्हापूर जिल्ह्याला भेट दिली असून, मृतांचा आकडा रोखण्यावर भर देण्यासाठी सूचना दिल्या होत्या. या फोर्सचा अहवाल उद्या येण्याची शक्यता आहे. दहाही तालुक्यांतील मृत असून, इतर जिल्ह्यातील पाचजणांचा यामध्ये समावेश आहे, तर कोल्हापूर शहरातील सहाजणांचा मृत्यू झाला आहे.
- शिरोळ ०८
यड्राव, नांदणी, शिरोळ, तमदलगे, जयसिंगपूर ४
- कोल्हापूर ०६
लक्षतीर्थ वसाहत, गणेश कॉलनी, नाना पाटील नगर, फुलेवाडी, जाधववाडी, विद्यानिकेतन
- इचलकरंजी ०६
- भोने मळा, मुसळे गल्ली, डेक्कन चौक, शहापूर, गुरूनानक नगर, इचलकरंजी
- करवीर ०६
उजळाईवाडी २, कणेरीवाडी, निगवे दुमाला, नेर्ली, गिरगाव
- हातकणंगले ०५
हुपरी, कबनूर, तारदाळ, कुंभोज, हेर्ले
- गडहिंग्लज ०४
मुगळी, मांगनूर, नांगनूर, हसूरचंपू
- कागल ०४
कसबा सांगाव, बोरवडे, नंद्याळ, कागल
- पन्हाळा ०३
सातवे, कोडोली, बच्चे सावर्डे
- चंदगड ०३
राजगोळी बु., चंदगड, हलकर्णी
- शाहूवाडी ०१
पाडळी
- आजरा ०१
आजरा
- राधानगरी ०१
कासारपुतळे
- इतर राज्ये, जिल्हे ०५
जिरग्याळ जत, कारदगा, शिगाव वाळवा, चिक्कोडी, कडलासा मंगळवेढा