संस्थेच्या कोल्हापूर व गडहिंग्लज येथे स्वमालकीच्या इमारती असून सर्व शाखा संगणकीकृत आहेत. संस्थेच्या सर्व शाखांमध्ये सोनेतारण कर्जाची ही सोय केली असून कर्ज आणि ठेवींचे योग्य प्रमाण राखण्यात संस्था यशस्वी झाली आहे. वेळोवेळी उद्भवलेल्या नैसर्गिक आणि राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी संस्थेने सामाजिक बांधीलकी मानून मदत केली आहे घर किंवा फ्लॅट खरेदी, घरबांधणी, वाढीव बांधकाम, घरदुरुस्तीकरिता २० वर्षे मुदतीचे एक कोटीपर्यंत कर्जपुरवठा केला आहे. याशिवाय प्लॉटखरेदीसाठी ७५ लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. गृहकर्जाच्या हप्त्यांना आयकर सवलत आहे. संस्थेचा कार्यविस्तार कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्हा असून लवकरच राज्य कार्यविस्तार करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
गेले वर्षभर कोरोनाचे सावट असतानाही संस्थेने १३५ कोटींचा व्यवसाय केला असून ५२ कोटी ६७ लाख २९ हजारांच्या ठेवी, तर २९ कोटी ८ लाख ७३ हजारांची कर्जे दिली आहेत. संस्थेचे २४ कोटी ५२ लाख १९ हजारांची गुंतवणूक केली असून, संस्थेचे खेळते भांडवल ६८ कोटी ९ लाख ५० हजारांचे आहे. संस्थेला गतवर्षात २१ लाख २४ हजारांचा निव्वळ नफा झाला असल्याचीही माहिती संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिली.
फोटो- मारुती मोरे