कोल्हापूर: जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि मृत्यूची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. नव्याने १३७६ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. ११४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात सर्वत्र अँटिजन चाचण्यांची संख्या वाढवली गेल्याने रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोल्हापूर शहरात गेल्या २४ तासात ४११ तर करवीर तालुक्यात ३०४ जणांना कोरोना झाला आहे. हातकणंगले तालुक्यात १२६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.
कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील मृतांची संख्याही वाढती असून करवीर तालुक्यात आठ तर कोल्हापूर शहरात सात जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १४ हजार ५१० चाचण्या करण्यात आल्या असून पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्के आहे.
चौकट
जिल्ह्यातील तालुकावार मृत्यू
करवीर ०८
वडणगे, उचगाव, कणेरी, पाचगाव ३, गांधीनगर, शिरोली दुमाला
कोल्हापूर ०७
शिवाजी पेठ ३, महावीरनगर, भोसलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, ताराबाई पार्क
हातकणंगले ०३
हेरले, हातकणंगले, कोरोची
राधानगरी ०२
चंद्रे, राधानगरी
शिरोळ ०२
शिवनाकवाडी, जयसिंगपूर
गडहिंग्लज ०२
नूल, कौलगे
इचलकरंजी ०१
आजरा ०१
कागल ०१
पन्हाळा ०१
बोरपाडळे
भुदरगड ०१
पुष्पनगर
इतर जिल्हे ०३
बोरगाव, चॉंदशिरदवाड, मुखेड