- संदीप बावचेजयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : बारमाही बागायती आणि भाजीपाल्याचे माहेरघर असणाऱ्या शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे तब्बल १४०३ संशयित रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब पुढे आली आहे. कॅन्सरने बाधीत झालेले व उपचार सुरू असलेल्या २४२ रुग्णांची नोंद झाली आहे.गेल्या दोन वर्षांपासून शिरोळ तालुक्यातील कॅन्सर रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा हादरुन गेली होती. लोकांमध्येही याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत पंचायत समिती वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत ‘घर टू घर’ सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद दातार यांनी दिली.>रजिस्टरी केंद्र सुरूकरणारशिरोळ तालुक्यात कॅन्सरग्रस्तांचा आकडा मोठा नाही. आम्ही कॅन्सर रजिस्टरी केंद्र सुरूकरणार आहेत. रुग्ण संख्येबाबत माहिती संकलनाबरोबरच शिरोळमध्ये कॅन्सरच्या रुग्णांची संख्या किती आहे, याची माहिती कळेल. - डॉ. रेश्मा पवार, कोल्हापूर कॅन्सर सेंटर
शिरोळमध्ये कॅन्सरचे १४०० संशयित, आरोग्य विभागाचा अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 4:13 AM