कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या संजीवनी अभियानांतर्गत सर्वेक्षणात शहरात गुरुवारी व्याधीग्रस्त २७७ नागरिकांपैकी १५ नागरिक कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणारे घरात बसलेले नागरिक या अभियानातून समोर येत आहेत. त्यामुळे संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.
शहरात गुरुवारी ४२२३ व्याधीग्रस्त नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये कोविडसदृश लक्षणे असणारे ४०६ नागरिक आढळून आले. त्यामध्ये २७७ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी १५ पॉझिटिव्ह आले तर ६२१ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. गुरुवारी अशी एकूण ९४९ व्याधीग्रस्त नागरिकांची तपासणी करण्यात आली.
गुरुवारी जवाहरनगर, मरगाई गल्ली, संध्यामठ गल्ली, शाहूनगर, दौलतनगर, राजारामपुरी, सम्राटनगर, यादवनगर, शाहूपूरी, शुक्रवार पेठ, दुधाळी, जुना बुधवार पेठ, बाजार गेट, चव्हाण कॉलनी, रणदिवे गल्ली, महादेव गल्ली, मराठा कॉलनी, उलपे गल्ली, नागाळा पार्क, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, लोणार वसाहत, साळोंखेनगर, भारतनगर, हरिओम नगर, गंधर्वनगरी, सानेगुरुजी वसाहत, दत्तनगर, फुलेवाडी, कदमवाडी, जाधववाडी, बापट कॅम्प, सदरबाजार, कारंडे मळा, सिद्धार्थनगर, नाळे कॉलनी, संभाजीनगर येथे १४९ वैद्यकीय पथकाद्वारे अभियान राबविण्यात आले.