दत्तात्रय धडेलजोतिबा : नवरात्रोत्सवात जोतिबाची रोज सालंकृत महापूजा बांधली जाते. या पुजेबरोबरच जोतिबाला तोफेची सलामी देखील दिली जाते. एकूण १५ वेळा या तोफेच्या सलामी दिल्या जातात. घटस्थापने दिवशी दोन, सलग नऊ दिवस धुपारतीच्या सांगता वेळी, खंडेनवमीला एक व दसऱ्याला तीन वेळा अशा एकूण १५ वेळा तोफेच्या सलामी होतात.तोफेची सलामी देण्याची ही पारंपारिक पध्दत आजही टिकून आहे. यावेळी उडवली जाणारी तोफ हे जोखमीचे काम आहे. पालखी धुपारतीचा प्रारंभ व सांगता तोफेच्या सलामी शिवाय होत नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून देवस्थान समितीकडे कार्यरत असलेले सुधाकर डबाणे हे जोखमीचे काम पार पाडत होते. विशेष म्हणजे त्यांनी यासाठी कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. मात्र, जोतिबाची परंपरा इनामइतबारे सांभाळण्याचे ते काम करतात. सद्या त्यांचा मुलगा प्रविण डबाणे हा तोफ उडविण्याचे काम करतो.म्हालदारच्या ललकारी नंतर तोफेची सलामीदर रविवारी आणि पौर्णिमेला भाविकांचा मेळाच भरतो. याच दिवशी रात्री जोतिबाची पालखीतून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर मंदिरात जाण्यापूर्वी पालखी गोमातेजवळील सदरेवर ठेवली जाते. पालखी सदरेवर विराजमान झाल्यानंतर रात्री नऊ वाजता म्हालदारच्या ललकारी नंतर तोफेची सलामी होते. तोफेवर इतिहासकालीन शिलालेख आहे. शिलालेखावर जुन्या इतिहासकालीन संदर्भाचा उल्लेख आहे. वर्षात लाखो भाविक जोतिबाचे दर्शन घेत असतात.तोफेची सलामी देणारे मोजकेच जाणकारडबाणे यांनी सांगितले की, नारळाची ओली शेंडी घ्यायची. त्यात महिनाभर तयार करुन ठेवलेली शोभेची दारु ठासून ती तोफेच्या वरच्या बाजूला असलेल्या लहान छिद्रातून आत सरकावयाची. त्या दारूच्या पिशवीला छिद्र पाडून बत्ती दिल्यानंतर तोफेच्या आवाजाने परिसर थरारतो. अशा प्रकारे तोफेची सलामी देणारे काही मोजकेच जाणकार सध्या आहेत. सध्या आवाजाची तोफ देवस्थान समितीच्या कार्यालयासमोर ठेवलेली पाहायला मिळते.
नवरात्रोत्सवात जोतिबा मंदिरात होतात १५ तोफाच्या सलामी, तोफेची सलामी देणारे मोजकेच जाणकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2022 5:17 PM