निवास वरपेम्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात तेरसवाडी पैकी मल्लेवाडी हे ३०० लोकवस्तीच छोटंसं खेडं. येथील शामल विठ्ठल पेंढरे या बारावीतील विद्यार्थिनीने ग. बा. पवार पाटील विद्यालय ( घानवडे) या विद्यालयात ८३. ६७ गुण प्राप्त करुन बारावीच्या परिक्षेत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला.शामलची आई मंगल पेंढरे व वडील विठ्ठल पेंढरे हे दोघेही अल्पशिक्षित असून वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करतात. गेल्या काही वर्षांपासून मल्लेवाडी गावाभोवती गव्यांची दहशत आहे. अशा या दुर्गम वाडीतून घानवडे येथे शिक्षणासाठी दररोज १५ किलोमीटरची पायपीट करत तिने यश संपादन केले.
अनेकवेळा करावा लागला गव्यांचा सामना मल्लेवाडी येथून बारावीचे शिक्षण घेणारी ती एकटीच. पहाटे कॉलेजला जाताना तिला अनेकवेळा गव्यांचा सामना करावा लागला. भौगोलिक परिस्थितीशी सामना करत शामलने बारावी परीक्षेत घवघवीत यश मिळवले. तिला वर्गशिक्षक प्रकाश गोते, प्राचार्य भिमराव रायकर, संभाजी नाईक, मोहन कुंभार, रघुनाथ ठिकपुर्ले यांचे मार्गदर्शन लाभले.