शहरं
Join us  
Trending Stories
1
“बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”: रामदास आठवले
2
“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन
3
Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातील मानाच्या पाचही गणपती बाप्पांचे विसर्जन
4
भारतात वेगाने वाढतीये करोडपतींची संख्या, ₹ 10 कोटी कमावणाऱ्यांच्या संख्येत 63 टक्क्यांनी वाढ
5
अमित शाह यांची हरियाणात अग्निवीरांसंदर्भात बडी घोषणा, नोकरीसंदर्भात दिली मोठी गॅरंटी
6
आगामी विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढणार; अजित पवार स्पष्टच बोलले
7
PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...
8
BSNL करणार सर्वांची सुट्टी...? रोज 3 रुपये खर्च, 300 दिवस मजा; अमर्याद डेटा अन् कॉलिंग!
9
IND vs BAN: विराट कोहली मारणार का बांगलादेशला जोरदार 'पंच'? खुणावतायत 'हे' 5 विक्रम
10
अजित पवार नाही, महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका; रामदास आठवलेंचे वक्तव्य
11
डॉक्टरांची मागणी मान्य, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय; IPS मनोज कुमारांवर नवी जबाबदारी
12
गणपती बाप्पाच्या लाडूचा 30 लाख रुपयांना लिलाव, भाजप नेत्यानं लावली बोली; काय आहे यात खास?
13
"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले
14
"असा जातीयवादी मुख्यमंत्री कधीही झाला नाही", पोलिसांनी रोखताच वाघमारेंची शिंदेंवर टीका
15
मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण; प्रफुल्ल पटेल म्हणाले, “मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण...”
16
CM पद सोडले, आता ‘या’ गोष्टींवर सोडावे लागणार पाणी; अरविंद केजरीवाल यांना किती मिळणार पगार?
17
“गणपती बुद्धीची देवता, सर्वांत जास्त गरज आहे त्यांना बुद्धी द्यावी”: देवेंद्र फडणवीस
18
Asian Champions Trophy 2024 : सिंग इज किंग! चीन झुंजले! पण जुगराजच्या गोलनं भारतानं पाचव्यांदा जिंकली ट्रॉफी
19
आमच्या आदेशाशिवाय कारवाई करू नका; बुलडोझर कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
20
"महिला डॉक्टरांना नाईट शिफ्ट करण्यापासून रोखू शकत नाही", सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Kolhapur: जादा परताव्याचे आमिषाने १५० कोटींची फसवणूक, जयसिंगपुरातून एजंट गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 4:15 PM

कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ

जयसिंगपूर : जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून जयसिंगपूर शहरातील हजारो गुंतवणूकदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. शासकीय नोकरदार, व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर आणि व्यापाऱ्यांना गंडा घालून आठ ते दहा एजंट गायब झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.शिरोळ तालुक्यातील अनेक प्रमुख गावात शेअर मार्केटच्या साखळीतील एजंटांनी फसवणुकीचे मोठे जाळे विणले आहे. अनेकांना परतावा मिळणे बंद झाले असून, मुद्दलदेखील अडकल्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. महिन्याकाठी जादा परताव्याचे आमिष दाखविणाऱ्या एजंटांची तालुक्यात साखळी तयार झाली होती.त्यातून अनेकांना गुंतवणुकीचे सल्ले देण्यात आले. शिवाय गुंतवणूक करण्यासही भाग पाडण्यात आले. जादा परताव्याच्या आमिषामुळे लाखोंचा आकडा कोटीत पोहोचला. काही महिने परतावा दिल्यानंतर गाशा गुंडाळून अनेक एजंटांनी पळ काढला. त्यामुळे मोठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी चांगलाच धसका घेतला आहे.गुंतवणुकीचा आकडा मोठाआमिषाला बळी पडलेले गुंतणूकदार आता एकत्रित येत आहेत. पैसे वसुलीचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या गावांमध्ये शेअर मार्केटचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. त्यामुळे तालुक्यातील गुंतवणूकदारांची ४०० ते ५०० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यांचा ससेमिरा वाढल्यामुळे आता हे प्रकरण अंगलट येणार म्हणून अनेक एजंट गायब झाले आहेत. यातून अंग काढण्यासाठी त्यांच्याकडून नवनवीन क्लुप्त्या सुरू आहेत.शेअर मार्केटचा फंडाशेअर मार्केटच्या गुंतवणुकीतून जादा पैशांचे आमिष दाखवून अनेकांना एजंटांनी गंडा घातला आहे. यामध्ये व्यावसायिकांची संख्या अधिक आहे. जयसिंगपुरातील एका बांधकाम ठेकेदाराचाही यात समावेश आहे. गुंतवणूक कार्यालयाचे उद्घाटन करायला गेलेल्या अधिकाऱ्यालाही २० लाखाला गंडा घातला आहे. अनेकांनी कर्ज काढून पैशांची गुंतवणूक केल्यामुळे न्यायप्रविष्ठ मार्गाने पैसे कसे मिळतील, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांत जाण्याची तयारी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरshare marketशेअर बाजारfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी