कोल्हापूर : सामाजिक बांधिलकी जोपासत वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचे सुपूत्र राेहित लाड यांनी कुडित्रे येथील कोविड सेंटरला १५ हजार रुपयांची औषधे व इतर साहित्य दिले.
कुडित्रे परिसरातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या कुडित्रे कोविड सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील रुग्णसेवा उत्कृष्ट असल्याने या सेंटरला मदत करण्याचा निर्णय लाड कुटुंबीयांनी घेतला. त्यानुसार ऑक्सिमीटर, मास्क, इंजेक्शन व इतर औषधे असे १५ हजार रुपयांचे साहित्य माजी उपमहापौर अर्जुन माने व करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते संबंधितांना देण्यात आले. यावेळी ‘कोजिमाशि’चे माजी सभापती कैलास सुतार, संचालक के. एस. खाडे, मच्छिंद्रनाथ शिरगावकर, मनोहर पाटील, डी. सी. नरके ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ए. एम. पाटील, प्रा. बी. डी. लोंढे, पी. आर. पाटील, सचिन लोंढे, संभाजी कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : कुडित्रे (ता. करवीर) येथील कोविड सेंटरला राेहित लाड यांनी १५ हजारांची औषधे व इतर साहित्य दिले. यावेळी माजी उपमहापौर अर्जुन माने, राजेंद्र सूर्यवंशी, कैलास सुतार, के. एस. खाडे आदी उपस्थित होते. (फोटो-२३०६२०२१-कोल-कुडित्रे)