कोल्हापूर : कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असून, सध्या ९४ कंटेन्मेंट झोन अस्तित्वास आहेत. त्यामधील सुमारे २७ हजार व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले, त्यापैकी १५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, प्रभाग सचिव, विविध पथके, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स सक्रिय झाले आहेत.शहरातील कोरोनाचा संसर्ग डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत कमी झाला होता. परंतु, संपूर्ण राज्यात संसर्ग वाढू लागला तसा कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातही रुग्ण आढळायला लागले. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात रोज शंभर आणि त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळून यायला लागले. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रिय झाली.
CoronaVirus Kolhapur Updates-कोल्हापुरात कंटेन्मेंट झोनमधील १५२ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 8:31 PM
CoronaVirus Kolhapur Updates- कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग वाढत असून, सध्या ९४ कंटेन्मेंट झोन अस्तित्वास आहेत. त्यामधील सुमारे २७ हजार व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले, त्यापैकी १५२ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, प्रभाग सचिव, विविध पथके, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स सक्रिय झाले आहेत.
ठळक मुद्देकोल्हापुरात कंटेन्मेंट झोनमधील १५२ पॉझिटिव्ह समूह संसर्ग सुरू : महापालिका यंत्रणा सक्रिय : उद्याने, बाजारपेठेवर लक्ष